सुशिक्षित गणेश ढवळे यांनी नोकरीच्या मागे न लागता पेरू लागवडीतून मिळवले दीड एकरात पाच लाखाचे उत्पन्न

0
185

जामखेड न्युज——

सुशिक्षित गणेश ढवळे यांनी नोकरीच्या मागे न लागता पेरू लागवडीतून मिळवले दीड एकरात पाच लाखाचे उत्पन्न

 

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील सुशिक्षित बेरोजगार बारावी उत्तीर्ण तरुणाने दीड एकर  (६० आर)क्षेत्रामध्ये पेरू लागवड करून पहिल्याच तोड्यात पाच लाख रुपये उत्पन्न घेतले आहे.

          पारंपारिक शेतीला फाटा देत हळगाव येथील शेतकरी गणेश ढवळे यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये तैवान पिंक पेरूची लागवड केली. दीड एकर क्षेत्रामध्ये नऊ बाय- पाच फूट अंतरावर लागवड केली. या अंतरानुसार १५०० रोपांची संख्या लागली. 

          झाडांची उंची  ६ते ७ फूट असून. एका झाडाला १००, व १५० ते २०० फळांची संख्या लागली असल्याने भरघोस विक्रमी उत्पादन मिळविता आले.

              तैवान पिंक पेरूला शहरामध्ये चांगली मागणी असल्याने शहरातील व्यापारी थेट बांधावर खरेदी करण्यासाठी येत आहेत. व्यापाऱ्याने ३० ते ३७ रुपये किलो प्रमाणे  पेरूच्या गुणवत्तेनुसार पेरू खरेदी केला. दीड एकर क्षेत्रामध्ये मध्ये २० टन पेरूचे उत्पादन निघाले. विक्रमी उत्पादन  निघाल्याने पाच लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. 

       ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलेल्या विविध मशागती, खत व्यवस्थापन, कीटकनाशक व्यवस्थापन व शेतात केलेल्या मुजरा मार्फत केलेल्या मशागती असा एक लाख पन्नास हजार रुपये खर्च आला. 

          पेरू लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला, तसेच भेसळ डोसची मात्रा वेळोवेळी देण्यात आली. झाडांची उंची वाढण्यासाठी व झाडांना फुटवे होण्यासाठी वेळोवेळी प्रगतिशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार व जामखेडचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मंडलाधिकारी हिरडे यांच्या मार्गदर्शनानुसार पेरू बागेचे व्यवस्थापन करण्यात आले. थेट पेरू बागेच्या बांधावर जाऊन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी युवा शेतकरी गणेश ढवळे यांना मार्गदर्शन केले. उत्कृष्ट पेरूचे बाग फुलविल्याने कौतुकही केले व इतर शेतकऱ्यांनी गणेश ढवळे यांचे मार्गदर्शन घेऊन पेरू लागवडीकडे वळलेले दिसत आहेत. ढवळे त्यांना मार्गदर्शन करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here