जामखेड न्युज——
सर्वज्ञ विकास जाधव याच्या वाढदिवसानिमित्त श्री साकेश्वर गोशाळेस हिरवा चारा!!!
लहान वयातच सामाजिक बांधिलकीची भावना जपली

चि. सर्वज्ञ विकास जाधव यांच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त वडील पोलीस कॉन्स्टेबल विकास जाधव यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड संचलित साकेश्वर गोशाळेत 70 गाईंना हिरवा चारा वाटप करण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले ,किशोर गायवळ, इंजिनियर सौरभ उगले मयूर भोसले सर, संतोष पवार सर, नाना खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.
जाधव कुटुंब नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होत असते आणि त्यातूनच वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून उपक्रम केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी सर्वांनी सर्वज्ञला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अगदी लहान वयात सामाजिक बांधिलकीची भावना बालमनावर रुजवली जात आहे. हे विशेष आहे.


