अंदुरे हल्ला प्रकरणातील आरोपीचे सिनेटाइलने पोलीसांच्या ताब्यातून पलायन

0
265

जामखेड न्युज——

अंदुरे हल्ला प्रकरणातील आरोपीचे
सिनेटाइलने पोलीसांच्या ताब्यातून पलायन

तीन महिन्यांपुर्वी अंदुरे कुटुंबीय यांच्यावरील हल्ला व खंडणी प्रकरणातील आरोपी डॉ. भगवान मुरूमकर हे खर्डा परिसरात असल्याची माहिती जामखेड पोलिसांना मिळाली त्यानुसार जामखेड पोलीसांचे पथक खर्डा परिसरात गेले असता जातेगाव परिसरात आरोपीच्या गाडीस थांबवून आरोपीस ताब्यात घेत असताना आरोपींच्या साथीदारांनी पोलीसांशी झटपट करून सिनेटाइलने आरोपीस पोलिसांसमोर पळवून नेले या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला सहकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी डॉ भगवान मुरूमकर सह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी पोलीस काँन्टेबल विजय कोळी व हे पोलीस पथकासह खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील जातेगाव फाटा येथे दि. २६ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता आरोपींचा शोध घेत असताना जातेगावकडून इनोव्हा कार एम एच १६. २३२४ येत असल्याची दिसली यावेळी पोलीसांनी आरोपीस गाडी थांबविण्यासाठी सांगितले असता आरोपी डॉ. भगवान मुरूमकर याने याच्या ताब्यातील गाडी मागे वळवून जातेगाव रोडने वेगाने गेला.

यानंतर पोलीसांनी आरोपीच्या गाडीचा पाठलाग करत असताना आरोपी भगवान मुरूमकर याने मोहरी गावच्या पुलाजवळ गाडी थांबवली यावेळी पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेत असताना आरोपी भगवान मुरूमकर म्हणाला मी येणार नाही म्हणत प्रतिकार केला यावेळी त्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाची काँरपिओ क्रमांक एम १६. ८०८३ पुर्ण नंबर माहिती नाही तसेच एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार नंबर माहीत नाही अशी दोन वाहने तेथे आली या गाडीतून आरोपी काका बबन गर्जे रा. नाहुली, आण्णा खाडे रा. पांढरेवाडी ता. जामखेड व इतर पाच अनोळखी अशी एकूण सात आरोपी गाडीतून खाली उतरत फिर्यादी व साक्षीदार यांना पाठीमागून मिठी मारत आरोपी आण्णा खाडे यांने आपल्या स्विफ्ट कार मध्ये आरोपी भगवान मुरूमकर यास बेकायदेशीर पणे बसवले अटकेला प्रतिकार करत आपल्या गाडीतून जातेगाव रस्त्याने फरार झाले.

या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्टेबल विजय दिगंबर कोळी यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून यातील मुख्य आरोपी तीन व इतर पाच अशा एकुण आठ जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला सहकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि प्रकाश पाटील हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here