जामखेड न्युज——
सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
राष्ट्रीय एकात्मता विषयावर चिमुकल्यांनी सादर केले विविध भाषेतून भाषणे
सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी जामखेड येथे ( सनराईज इंग्लिश स्कूल, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्व. एम. ई.भोरे ज्युनियर काॅलेज मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इंग्लिश स्कूल मधील चिमुकल्या मुलांनी जापनीज, पंजाबी, इंग्लिश, हिंदी,संस्कृत व मराठी भाषेतून भाषणे करत राष्ट्रीय एकात्मता दाखवली.
चिमुकल्यांच्या कलागुणांना पालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
26 जानेवारी देशाचा राष्ट्रीय सण
वैविध्यपूर्ण धर्म, श्रद्धा आणि संस्कृतींचा देश असलेल्या भारतात दररोज काही ना काही सण साजरे केले जातात. आपल्या देशात प्रत्येक धर्मात सण साजरे करण्याची परंपरा आहे, परंतू, काही सण असे आहेत जे प्रत्येक देशवासीयांसाठी महत्त्वाचे आहेत.
ते देशभर आदराने आणि आपुलकीने साजरे केले जातात. 26 जानेवारी हा देखील असाच एक सण आहे. जो देशाचा राष्ट्रीय सण आहे. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा,जातीचा किंवा पंथाचा असो, हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो.
आपली राष्ट्रीय एकात्मता दाखवण्यासाठी
सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी जामखेड येथे सनराईज इंग्लिश स्कूल, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्व. एम. ई.भोरे ज्युनियर काॅलेज मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इंग्लिश स्कूल मधील चिमुकल्या मुलांनी जापनीज, पंजाबी, इंग्लिश, हिंदी,संस्कृत व मराठी भाषेतून भाषणे केली. संस्कृत, जपानी, पंजाबी, मराठी भाषेत भाषणे केली.
चिमुकल्यांचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.