जामखेड न्युज——
सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सचिन गायवळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त साकेश्वर गोशाळेस चारा वाटप.
प्रा. सचिन गायवळ यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद -पांडुरंग भोसले
सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरासह तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. गायवळ कुटुंबीय आपल्या कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस गोशाळेत साजरा करतात तसेच प्रा. सचिन गायवळ यांनीही गोशाळेतील गायींना तीन दिवस पुरेल एवढा हिरवा चारा दिला.
सामाजिक कार्यकर्ते , पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव प्रा. सचिन गायवळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित साकेश्वर गोशाळेमध्ये 70 गाईंना तीन दिवस पुरेल इतका हिरवा चारा दिला.
सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ व प्रा सचिन गायवळ कुटुंब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे ते आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असला तर प्रथमता गो शाळेवर साजरा करतात व पुढील कार्याची सुरुवात करतात. त्यांचे हे सामाजिक कार्य अतिशय चांगले व कौतुकास्पद असून गोशाळेसाठी चारा देने ,शेड उभारणीसाठी नेहमीच मदत करतात. व शिवप्रतिष्ठान तालुक्याच्या वतीने यांना शुभेच्छा असे मनोगत शिवप्रतिष्ठान तालुका प्रमुख प्रमुख पांडुरंग भोसले यांनी व्यक्त केले.
यावेळी गोशाळाच्या वतीने प्राध्यापक सचिन गायवळ यांचा फेटा बांधू सन्मान करण्यात आला. व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख उपस्थिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तालुका अध्यक्ष पांडूराजे भोसले, राजेशजी देशपांडे, बापू सर कदम, किशोर गायवळ, बबलू गोलेकर, योगेश सुरवसे, विशाल दौंड, हर्षद ढाळे, तुषार बोथरा, अनिल गायवळ, आकाश ढोले, गोवर्धन कडू, दत्ता गिरी, बापूसाहेब घाडगे, किरण राऊत, रमेश टिपरे, समीर गायकवाड, मयुर भोसले, शिवाजी नाना खंडागळे, ओम बामदळे, सिध्येश पवार, नाना पवार सर्व मित्रपरिवार व मान्यवर उपस्थित होते..
यावेळी राजेश देशपांडे यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच किशोर गायवळ मनोगत मध्ये गायवळ व गोशाळा यांचे एक मिळते जुळते समीकरण आहे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस गोशाळेवरच साजरा केला जातो. व पुढील सामाजिक राजकीय कार्यास व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.