जामखेड न्युज——
नगरसेवक मोहन पवार यांच्या वतीने गुणवंत्तांचा सन्मान

तपनेश्वर भागातील विविध गुणवंत्तांचा सन्मान नगरसेवक मोहन पवार यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.

जामखेड शहरातील तपनेश्वर भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर येथे मुख्याध्यापक सुरेश मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण तर मुलांच्या कलागुणांना वाव व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नगरसेवक मोहन पवार यांच्यावतीने व हस्ते विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक मोहन पवार, उमेश माळवदकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र आदे, प्रा. कुंडल राळेभात, सलीम तांबोळी, शाम पंडित, डॉ. कैलास हजारे, परवेझ सय्यद, शैलेश मोरे, महिला पालक स्वाती वारभोग, मुख्याध्यापक सुरेश मोहिते, शिक्षक प्रताप पवार, आरेकर, श्रीमती कांबळे, साळूंके, मोहिते, वराट, राक्षे आदींसह मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



