Wednesday, February 11, 2026
Home शैक्षणिक बातम्या देशसेवकाच्या हस्ते श्री साकेश्वर विद्यालयात ध्वजारोहण संपन्न

देशसेवकाच्या हस्ते श्री साकेश्वर विद्यालयात ध्वजारोहण संपन्न

0
208

जामखेड न्युज——

देशसेवकाच्या हस्ते श्री साकेश्वर विद्यालयात ध्वजारोहण संपन्न

श्री साकेश्वर विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त देशसेवक हरिदास वराट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशसेवकाच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या श्री साकेश्वर विद्यालय साकत येथील विद्यालयात आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा व विद्यालयातील विद्यार्थ्यांची गावात प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच मनिषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यानंतर साकत सेवा संस्थेचे ध्वजारोहण देशसेवक हरिदास वराट यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहणही हरिदास वराट यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर शेवटी श्री साकेश्वर विद्यालयात देशसेवक हरिदास वराट यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मुलांची परेड झाली परेड नंतर विद्यालयात देशभक्ती पर गीते सादर करण्यात आले. देशसेवक हरिदास वराट यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले.

यावेळी साकत सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रा. अरूण वराट, सरपंच हनुमंत पाटील, मुख्याध्यापक दत्ता काळे, माजी चेअरमन हनुमंत वराट, पोलीस पाटील महादेव वराट, माजी सरपंच हरिभाऊ मुरूमकर,उपसरपंच राजाभाऊ वराट, संचालक नानासाहेब लहाने, महादेव वराट, पोपट वराट, भाऊसाहेब पुलवळे, नाशिक लहाने, पांडुरंग सानप, गणेश वराट, युवराज वराट, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, नागेश वराट, विठ्ठल वराट, दिनकर मुरूमकर, संतोष देशमुख, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, विजय हराळे, अतुल दळवी, अण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

हरिदास वराट हे लान्स हवालदार पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सन्मान म्हणून श्री साकेश्वर विद्यालयात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले यानंतर हरिदास वराट यांनी सर्व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप केले.

यानंतर ग्रामस्थांसमोर मुलांची परेड झाली परेड नंतर विद्यालयात देशभक्तीपर गीते सादर करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!