साकत परिसरातील सापडलेल्या अजगराला सर्पमित्र व वनविभागाच्या सहाय्याने सोडले निसर्गाच्या सानिध्यात

0
241

जामखेड न्युज——

 

साकत परिसरातील सापडलेल्या अजगराला सर्पमित्र व वनविभागाच्या सहाय्याने सोडले निसर्गाच्या सानिध्यात

तालुक्यातील साकत परिसरात मुलनमळा भागात मोठा साप अजगर (इंडियन राँक पायथन) दिसला ते पाहताच लोक घाबरले याच वेळी गावातील पुणे येथे असलेले सर्पमित्र संपत पुलवळे गावात असल्याची माहिती मिळाली ताबडतोब त्यांना बोलावले त्यांनी या अजगराला अलगत पकडले व वनविभागाला याची कल्पना दिली वनविभागाच्या सहाय्याने अजगराला निसर्गाच्या सानिध्यात सोडले.

गावातील मुलनमळा येथे आढळलेल्या अजगराला सर्पमित्र संपत पुलवळे यांनी अलगद पकडले याची कल्पना वनविभागाचे अधिकारी प्रविण उबाळे यांना सांगितले व अजगराला निसर्गाच्या सानिध्यात सोडले.

यावेळी सर्पमित्र अँड. संपत पुलवळे, वनविभागाचे अधिकारी प्रविण उबाळे, योगेश पुलवळे, सुनिल पुलवळे, राम पुलवळे, सुमित घोडेस्वार यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

संपत पुलवळे हे मुळचे साकतचे रहिवासी असून ते पिंपरी चिंचवड पुणे येथे प्राणीसंग्रहालयात पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत होते. आता ते सेवा निवृत्त झाले आहेत. सध्या ते वकिलीचा व्यवसाय करतात. शेतीच्या कामासाठी ते सध्या गावी आलेले आहेत. तेव्हा आज सकाळी लोकांना साप दिसल्याने लोक घाबरले तर काही सापाला मारण्याची तयारी करू लागले हि गोष्ट सर्पमित्र संपत पुलवळे यांना समजली त्यांनी ताबडतोब तेथे जात लोकांना सांगितले की हे अजगर आहे. त्याला मारू नका आणि ते पकडले व वनविभागाच्या सहाय्याने जंगलात सोडले.

चौकट
साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांना नष्ट करतो. त्यामुळे साप दिसल्यास त्याला मारू नये, सर्पमित्रांना बोलवावे किंवा त्यास शेतात जंगलात जाऊ द्यावे. सापांना मारू नये असे आवाहन सर्पमित्र संपत पुलवळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here