जामखेड न्युज——
तनुश्री पोले धनुर्विद्येत मराठवाडा विभागात तिसरी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
ल ना होशिंग माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयातील संगणक तज्ञ व समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख विशालजी पोले यांची मुलगी तनुश्री पोले ( तनू ) जिल्हास्तरावरील आर्चरी ( धनुष्यबाण) स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले होते. विभागीय पातळीवर मराठवाडा विभागात तिसरी आली त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तिची निवड विभागीय स्तरावर मराठवाडा विभागात तिसरी आली आहे आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यामुळे तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल
दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक तसेच प्राचार्य श्रीकांत होशिंग, माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पोले, क्रीडा शिक्षक अजीम शेख, राघवेंद्र धनलगडे, बापू जरे, अनिल देडे, विजय क्षिरसागर यांच्या सह अनेक मित्रमंडळी, कुटुंबीय व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तनुश्री ही इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असुन ती अनिशा ग्लोबल आष्टी येथे शिकत असुन जिल्हास्तरावर गोल्ड मेडल जिंकले होते. औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती मराठवाडा विभागात झालेल्या स्पर्धेत तिचा तिसरा क्रमांक आला यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या यशामुळे जामखेड, आष्टी व करमाळा परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.