जामखेड न्युज——
शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी वेधले शिक्षण विभागातील समस्या कडे लक्ष, केंद्रप्रमुख संघटनेचे पदाधिकारी नसावेत इतर पात्रता धारकांची नेमणूक करावी
शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील समस्या कडे लक्ष वेधले यात केंद्रप्रमुख संघटनेचे पदाधिकारी नसावेत इतर पात्रता धारकांची केंद्रप्रमुख म्हणून नेमणूक करावी या सह अनेक शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ यांची शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे.

नुकतीच शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात व केंद्रप्रमुख पदाच्या पदभार संदर्भात शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी श्री कैलास खैरे यांची भेट घेतली यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात व ते सोडवणूक करण्यासंदर्भात गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ यांना मागणी करण्यात आली, मंजूर असलेली मेडिकल बिले काढण्यात यावीत , तसेच राहिलेली मेडिकल बिले मंजूर करण्यात यावीत, याचबरोबर वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव त्वरित वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात यावेत, त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या परवानगी देण्याचे आदेश निर्गमित करावेत

पदवीधर शिक्षकांनी मुख्याध्यापक पदोन्नती घेतलेल्या मुख्याध्यापकांचे शिक्षणाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार एस 15 या वेतनश्रेणीत वेतन निश्चित करावे, आदी मागण्या संदर्भात गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना भेटून प्रश्न सोडवण्यासंदर्भात चर्चा केली याचबरोबर तालुक्यामधील एकूण 11 केंद्रप्रमुख पदे मंजूर आहेत यापैकी फक्त दोन कार्यरत आहेत व नऊ केंद्रप्रमुख पदावर प्रभारी शिक्षक कामकाज पाहत आहेत यामधील बहुतांश पदभार दिलेला केंद्रप्रमुख हे काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत. व यामुळे शिक्षकांना संघटनात्मक त्रास व अन्याय होऊ शकतो यामुळे या पदासंदर्भात त्या केंद्रातील ग्रेड मुख्याध्यापक,

पदवीधर शिक्षक व तंत्रश्नेही शिक्षक या पद्धतीने पदभार देण्यात यावा व माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प.अहमदनगर यांनी दिलेले पत्र क्रमांक कार्या १/पीई ३/पदो/ 414 /2022 अहमदनगर दिनांक 24 /8/ 2022 नुसार कार्यवाही करण्यात यावी अशा संबंधीचे निवेदनही गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी श्री कैलास खैरे यांना देण्यात आले आहे या निवेदनावर शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मोहोळकर, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष राम निकम, महिला आघाडी अध्यक्ष मनीषा वाघ, नारायण लहाने, वैजनाथ गीते, सौ सीमा निकम आदींच्या सह्या आहेत