जामखेड न्युज——
ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये शालेय विज्ञान भव्य प्रदर्शन संपन्न
४ व ५ जानेवारी २०२३ रोजी ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयामध्ये शालेय भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.त्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, मुख्याध्यापक दशरथ कोपनर,मुख्याध्यापक अप्पासाहेब शिरसाट , उपमुख्याध्यापक रमेश अडसुळ, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे,विज्ञान प्रमुख बबन राठोड यांच्या हस्ते झाले.
विज्ञान प्रदर्शन उद्घाटनानंतर आदरणीय गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विज्ञानाचे उपकरण पाहून कौतुक केले व त्याचबरोबर जास्तीत जास्त चांगले मॉडेल करून भविष्यात आपण आपल्या शाळेचे नाव उंच करावे असे सांगितले.
शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यालयातील साधारणपणे 125 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले मॉडेल तयार केले होते.
प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग साहेब यांनी विज्ञान युगात विविध चांगल्या समाज उपयोगी शेती उपयोगी किंवा कारखान्यांमध्ये उपयोगी विद्यार्थ्यांच्याकडून भव्य असे उपकरण तयार व्हावे त्याचा आनंद व अभिमान निश्चित शाळेला आहे.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला याबद्दल विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. त्याचबरोबर सर्व सहभागी विज्ञान प्रदर्शनातील उपकरणे यांचे परीक्षण करून त्यातील निवडक मॉडेल तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी निवडण्यात आल्या.परीक्षण प्राध्यापक श्री शिरसाट सर,श्री वराट सर, श्री वाकळे सर,श्री कुलकर्णी सर यांनी केले.
शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी जामखेड तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळा यांनी भेटी दिल्या.अनेक विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्याचा लाभ घेतला त्या सर्व बाल वैज्ञानिकांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच या प्रदर्शनाचे विशेष होय त्याचबरोबर विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी या प्रदर्शन पाहिले.
त्याचबरोबर प्रदर्शन पाहण्यासाठी व विद्यालयातील बालवैज्ञानिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री अरुणशेठजी चिंतामणी साहेब,सेक्रेटरी श्री शशिकांत जी देशमुख साहेब खजिनदार श्री राजेशजी मोरे साहेब उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान प्रमुख श्री बबनराव राठोड,गणित विभाग प्रमुख श्री भरत लहाने,श्री रोहित घोडेश्वार,श्री कैलास वराट,श्री हनुमंत वराट,श्री अजित सांगळे,श्री सुरज गांधी,श्री पंकज पोकळे,श्री विकास पाचारणे,श्रीमती वंदना अल्हाट सर्वांनी प्रयत्न केले.