जामखेड न्युज——
अडसुळ कुंटुबीयांनी सहलीच्या विद्यार्थ्यांची चहा व नाष्ट्याची केली सोय
श्री साकेश्वर विद्यालयाची तीन दिवसीय शैक्षणिक सहल बीड, सिंदखेडराजा, लोणार सरोवर, शेगाव वरून अजिंठा येथे जात असताना बुलढाणा येथे साकतचे मुळ रहिवाशी व हल्ली बुलढाणा येथे व्यापार उद्योगात नावलौकिक मिळवलेले दत्तात्रय अडसुळ कुंटुबीयांनी विद्यार्थ्यांची आपुलकीने चहा व नाष्ट्याची केली सोय करत सर्वाची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या श्री साकेश्वर विद्यालयाची तीन दिवसीय शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे पाच जानेवारी ते आठ जानेवारी बीड, सिंदखेडराजा, लोणार सरोवर, शेगाव, अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, औरंगाबाद, पैठण अशी आयोजित करण्यात आली आहे. शेगाव वरून बुलढाणा येथे येत असताना दत्तात्रय अडसुळ कुंटुबीयांनी सर्व विद्यार्थ्यांची चहा व नाष्ट्याची सोय केली.
मुळचे साकतचे रहिवासी असलेले दत्तात्रय अडसुळ हे ३७ वर्षापूर्वी साकतहून बुलढाणा येथे आले आणी छोटे किराणा दुकान सुरू केले आज अडसुळ कुंटुबीयांनी उद्योग व्यवसायात बुलढाण्यात मोठे नावलौकिक केले आहे. आडत व्यवसाय तसेच चणा मील आहे. आपल्या गावची सहल म्हटल्यावर सर्व विद्यार्थ्यांना घरी बोलावले चहा, नाष्टा सोय केली सर्वाना चाॅकलेट दिले सर्व विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
यावेळी दत्तात्रय अडसुळ कुंटुबीय, गजानन अडसुळ, हिराबाई अडसुळ, मच्छिंद्र वराट, सर्व कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी केली यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.