अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, जामखेड पोलीस स्टेशनला पोक्सो नुसार गुन्हा दाखल

0
219

जामखेड न्युज——

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, जामखेड पोलीस स्टेशनला पोक्सो नुसार गुन्हा दाखल


जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील अल्पवयीन पिडीत मुलीशी लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करून दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गावातीलच आरोपी रा. डोणगाव) याचे विरुध्द पोक्सो अँक्टसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आसल्याची माहिती समोर आली आहे.

या बाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील १६ वर्षे ४ महिने वयाची अल्पवयीन पिडीता आपले राहते घरासमोर बसलेली असताना या घटनेतील आरोपी  याने तिच्या जवळ जावून पिडीतेच्या उजव्या हाताचे मनगट आपल्या हाताने पकडुन तीस म्हणाला की, मला तुला चिठ्ठी दयायची आहे. असे म्हणत तीच्या उजव्या हाताचे मनगट दाबुन सदर पिडीतेस लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करुन, दमदाटी करत म्हणाला की, तु जर याबाबत कोणाला याबाबत काही सांगीतले तर मी तुला जिवे मारत असतो. अशी धमकी दिली. यानुसार या घटनेतील फिर्यादी पिडीता हीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी (रा. डोणगाव) याचे विरुध्द भा.द.वि. कलम ३५४, ३५४(४), ५०६, पोक्सो अँक्ट अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील फिर्यादी पिडीतेच्या राहते घरासमोर दि. १० डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५: ४५ वा. चे सुमारास घडली आहे.

या बाबतचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here