मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ जामखेड कडकडीत बंद

0
209

जामखेड न्युज——

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ जामखेड कडकडीत बंद

भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रातिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जे अवमानास्पद भाष्य केल्या प्रकरणी जामखेड येथिल राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, बौद्ध महासभा, समस्त भिमसैनिक यांच्या वतीने आज दि. ११ रोजी पुकारलेले जामखेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यापारी वर्गांनी आपआपली दुकाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला.


दरम्यान याच कारणाने जाहीर निषेध करण्यासाठी काल शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी ठीक सकाळी ११:३० वाजता जामखेड शहरातील खर्डा चौक येथे निषेध सभा व जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते.

 

यावेळी राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभाक्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, नगरसेवक मोहन पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, वैजीनाथ पोले, जामखेड शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, प्रा. कुंडल राळेभात, माजी ग्रामपंचायत सदस्य ईस्माईल सय्यद, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, सचिन शिंदे, विकास राळेभात, प्रशांत राळेभात, प्रकाश काळे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, उमर कुरेशी, प्रविण उगले, मनोज भोरे, महेश निमोणकर, प्राचार्य विकी घायतडक, अमोल लोहकरे, वसिम सय्यद (मंडप), पवन राळेभात, अमित जाधव, दिगंबर ढवळे, बबन तुपेरे, महेश राळेभात, नरेंद्र जाधव, प्रदीप शेटे, संभाजी राळेभात, फिरोज बागवान, दिगांबर चव्हाण, संजय डोके, गणेश हगवणे, समीर पठाण, आशोक आव्हाड, बाबा सोनवणे, कबीर घायतडक, माजी सरपंच शिवाजी ससाणे, सुरेखा सदाफुले, बबलू तुपेरे, दिपक घायतडक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here