जामखेड न्युज——
ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाने उघडले खाते शिऊर मधील दोन जागा बिनविरोध
हि तर सुरूवात आहे. आगे – आगे देखो होता है क्या – अजय काशीद
जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिऊर ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाने दोन जागा बिनविरोध करत निवडणूक निकालाआधीच विजयीघौडदौड सुरू केली आहे. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशीद म्हणाले की, हि तर सुरूवात आहे. आगे – आगे देखो क्या होता है तिन्ही ग्रामपंचायत मध्ये भाजपाला घवघवीत यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद म्हणाले की, आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुक्यातील येणाऱ्या सर्वच निवडणूकीत भाजपाला चांगले यश मिळेल तसेच पुढील काळात भाजपा कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल असेही सांगितले.
भाजपने ग्रामपंचायत निवडणुक निकाला आधीच जामखेड तालुक्यात विजयी घौडदौड सुरू केली आहे. शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शितल इंगोले आणि शोभा पिंपरे या दोन महिला उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे या दोन्ही महिला उमेदवार बिनविरोध झाल्या आहेत. भाजपने शिऊरमध्ये दोन जागांवर खाते उघडले आहे. आमदार राम शिंदे यांची जादूची कांडी फिरू लागल्याचे संकेत आता यानिमित्ताने दिसू लागले आहेत.
दोन्ही बिनविरोध झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशीद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर,नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, धामणगावचे सरपंच महारुद्र महारनवर, साकतचे माजी सरपंच सदाशिव वराट,उद्धव हुलगुंडे, बाप्पुसाहेब माने, विठ्ठल चव्हाण, पाटोदा सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक महारनवर, आप्पासाहेब ढगे, डॉ नानासाहेब देवकाते, गणेश डोंगरे, तात्या काळे पाटील, संदिप जायभाय, विनोद चव्हाण, राजू शिंगणे, दत्ता गिरी, भाऊ पिंपरे, गणेश निकम, दादासाहेब निकम, भाऊसाहेब तनपुरे, आजिनाथ निकम,आजिनाथ समुद्र, संदिप जायभाय, आप्पासाहेब निकम, उत्तम तनपुरे, आण्णासाहेब निकम सह आदी मान्यवर
आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.