जामखेड न्युज——
प्रदूषणमुक्त शेती ही काळाची गरज- राजेंद्र सुपेकर कृषी अधिकारी
एनसीसीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रदुषण मुक्त शेतीवर व्याख्यान
एन.सी.सी च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व जागतिक प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त आज १७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी अहमदनगर व एन.सी.सी विभाग जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने.जामखेड महाविद्यालय जामखेड या ठिकाणी पर्यावरण पूरक शेती व प्रदूषण मुक्त शेती यावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर हे लाभले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रदुषण मुक्त शेती ही काळाची गरज असून ती कशी करावी तसेच शेती करत असताना शेतीमधून होणारे प्रदूषण कमी कसे करावे या संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून ऊस शेती,फळबाग, तुर, भाजीपाला इत्यादी वर मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा व औषधांचा अतिरिक्त वापर केल्यामुळे मानवी, प्राणी जीवनावर व शेतीच्या उत्पादन क्षमतेवर होणारा परिणाम सांगितला. जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय शेती व प्रदूषण मुक्त शेती करण्याचे कॅडेटस् व उपस्थितांना आवाहन केले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉ. डोंगरे एम. एल. प्रमुख उपस्थिती श्री होशिंग साहेब प्राचार्य ल.ना होशिंग विद्यालय जामखेड, प्राचार्य मडके साहेब श्री नागेश विद्यालय जामखेड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन केळकर गौतम यांनी केले. थर्ड ऑफिसर मयूर भोसले यांनी कार्यक्रमाचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेकंड ऑफिसर देडे अनिल सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी १७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष, अॅडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल रणदीप सिंह, सुभेदार मेजर लोकेंद्र सिंह यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमामध्ये तिन्ही महाविद्यालयातील एन.सी.सी कॅडेटस् सहभाग घेतला.