जामखेड न्युज——
श्री साकेश्वर विद्यालयात आरोग्य विभागाच्या वतीने योग प्रशिक्षण वर्ग
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि केंद्राच्या हद्दीतील गावांमध्ये जिल्हा आरोग्य विभागाच्या पुढाकाराने योग प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आरोग्य विभागामार्फत योग प्रशिक्षण सत्र श्री साकेश्वर विद्यालयात संपन्न झाले.
योग शिक्षक संजय मोरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना साधे सोपे योग शिकवले व योग करून घेतले.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाखरे, आरोग्य सेवक लहू जेधे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह सर्व विद्यार्थी हजर होते.
यावेळी योग शिक्षक मोरे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच रोज योग करा व ठणठणीत राहा प्रसन्न राहा असेही सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट यांनी तर आभार महादेव मत्रे यांनी मानले