जामखेड न्युज——
कै.सुरेश दिगंबरराव मोरे स्मृती निबंध स्पर्धा ल.ना. होशिंग विद्यालयात संपन्न!!
दिनांक५-१२-२०२२ सोमवार रोजी ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कै.सुरेश दिगंबरराव मोरे स्मृती प्रित्यर्थ निबंध स्पर्धा घेण्यात आल्या, या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला जवळपास ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाच्या वेळी उद्घाटक म्हणून श्री राजेशजी मोरे खजिनदार दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन आपण या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने विषयाला अनुसरून योग्य लिखाण करण्याची सवय लावावी स्पर्धेच्या युगात आपण सर्वच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन सहभाग नोंदवला पाहिजे.
प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग त्यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये गेल्या वीस वर्षापासून कै.सुरेश दिगंबरराव मोरे स्मृती प्रित्यर्थ निबंध स्पर्धा घेण्यात येतात. त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी श्री राजेशजी मोरे खजिनदार यांच्यावतीने विद्यार्थ्यांना देण्यात येतात,विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल राजेश मोरे यांचे विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले,उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ,पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे शिक्षक प्रतिनिधी श्री रोहित घोडेस्वार,समारंभ प्रमुख श्री नरेंद्र डहाळे सर ज्येष्ठ शिक्षक श्री प्रवीण गायकवाड सर अध्यक्ष जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटना जामखेड श्री ईश्वर कोळी भाऊसाहेब श्री श्री बबन राठोड सरविज्ञान प्रमुख श्री भरत लहाने सर,श्री राऊत मुकुंद सर,श्री पोपट जगदाळे सर,श्री विशाल पोले सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयकुमार क्षीरसागरसर,
साई भोसले सर,सुरज गांधी सर,अजित सांगळे सर,आदित्य देशमुख सर,पंकज पोकळे सर , विनोद उगले सर,विकास पाचरणे सर,सदाफुले सर सर्वांनी काम केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख श्री अनिल देडे यांनी केले व आभार प्रदर्शन समारंभ प्रमुख श्री नरेंद्र डहाळे यांनी केले.