जामखेड न्युज——
अबब… जामखेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने केले तब्बल आठ हजार किलो गोमांस जप्त
नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
नगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. नगर जामखेड मार्गे खडकत येथे चाललेले दोन गोमांसाचे दोन ट्रक जामखेड जवळ पकडण्यात आले आहेत यात आठ टन गोमांस दोन्ही वाहने एक क्रेटा गाडी असा चौतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात गोमांस घेऊन निघालेल्या दोन ट्रक जामखेड पोलिसांनी शिताफीने पकडल्या. या दोन ट्रकमधून सुमारे आठ हजार किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. या कारवाईत सुमारे 34 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलिस हेड काँन्स्टेबल संदीप पवार यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, नगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील आष्टी येथील खडकत येथे गोमांस वाहतूक सुरु असल्याची माहिती जामखेड पोलिसांना कळाली. त्यानंतर पोलिसांना नगर-बीड रस्त्यावरील हाँटेल कावेरी जवळ दोन लाल रंगाचे आयशर टेम्पो पकडले. या टेम्पोची तपासणी केली असता, दोन्ही टेम्पोत प्रत्येकी चार हजार किलो गोमांस आढळले. चालकाकडे याबाबत विचारणा केली असता तौफीक कुरेशी (रा. अहमदनगर) यांच्या सांगण्यावरून शेख अझहर अय्युब (रा. खडकत, ता. आष्टी) याच्याकडे हे गोमांस घेऊन जात असल्याचे समजले. पोलिसांनी दोन्ही आयशर (क्र. एमएच 12 एफसी 6359 व एमएच 17 बीवाय 2478) ताब्यात घेतले. तसेच शेख अझहर याच्याकडील क्रेटा कंपनीची (एमएच 09 डीएक्स 6109) ही कारही ताब्यात घेतली.
या गुन्ह्यात पोलिसांनी मुक्तार अब्दुल करीम शेख (रा. वार्ड नं. 2 श्रीरामपूर), अतुलमश फैयाज चौधरी (रा. नालबंद खुंट, अहमदनगर), महेशकुमार लोध (मध्यप्रदेश), अहमद कल्लू अन्सारी (मध्यप्रदेश), समी अहमद खान (उत्तरप्रदेश), सादिक सत्तार कुरैशी (रा. खर्डा रोड, जामखेड), तौफीक कुरेशी (अहमदनगर), शेख अझहर अय्युब (रा. खडकत, ता. आ्ष्टी) व एका फरार झालेल्या अनोळखी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास जामखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काँन्स्टेबल एस. डी. लोखंडे हे करत आहेत.