जामखेड न्युज——
भारतीय संविधान देशाचा आत्मा आहे. …… ॲड. डॉ.अरुण जाधव
खर्डा दिनांक २६…. या देशातील प्रत्येक माणसाला संविधानाने सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. व प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. असे उदगार वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. डॉ.अरुण जाधव यांनी व्यक्त केले . ते खर्डा येथे दिनांक २६ रोजी आयोजित संविधान प्रबोधन मेळाव्यात बोलत होते . खर्डा येथील कानिफनाथ मंदिराजवळ संविधान प्रबोधन मेळावा घेण्यात आला.
यावेळी संविधानाचे पूजन खर्डा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार रावसाहेब नागरगोजे, केंद्रप्रमुख सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, लोक अधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ ,पोलीस कॉन्स्टेबल धनवडे , पोलीस कॉन्स्टेबल चखाले, इस्माईल चाचा मदारी, सरपंच दादासाहेब दाताळ, पत्रकार दत्तराज पवार बाळासाहेब शिंदे, घीसाडी समाजाचे युवा नेते सागर चव्हाण आधी हजर होते. यावेळी बोलताना अरुण जाधव म्हणाले की, संविधानामुळे माणसाला व या देशाला समता स्वातंत्र्य बंधुता मिळाले. त्यामुळे संविधान प्रत्येकाच्या घरात गेले पाहिजे हे संविधान प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे शिकवले.
गरीब श्रीमंतीचा भेदभाव नष्ट केला., आणि हे संविधान या देशाला समर्पित केलं तो 26 नोव्हेंबर 1949 चा दिवस. प्रत्येकाने या दिवसाचे स्मरण केले पाहिजे .असे जाधव यांनी सांगितले. यावेळी प्रवक्ते बापूसाहेब ओहळ यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की,स्वातंत्र्य पूर्व काळात लोकशाही नव्हती तर हुकूमशाही होती,सर्वांना समान हक्क नव्हते.मतदान ठराविकच लोक करीत,पण संविधानाने श्रीमंतापासून गरिबांना मतदानाचा हक्क मिळाला.आदिवासी,भटके विमुक्त यांचा तर कोणीच विचार करीत नाहीत.मात्र संविधान सर्वांचा विचार करते. सुनील लोंढे ,वबाळासाहेब शिंदे, सातपुते यांनी आपले विचार मांडले. या मेळाव्यासाठी खर्डा व बहुजन समाजातील आदिवासी पारधी समाजातील महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संविधान प्रचारक विशाल पवार ,गणपत कराळे ,प्रवीण सदाफुले ,भीमराव सुरवसे,तसेच कार्यकर्ते लखन जाधव, लाला वाळके ,अंकुश पवार ,सचिन भिंगारदिवे,ऋषिकेश गायकवाड,संतोष चव्हाण आधी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव बागडे यांनी केले, तर आभार गणपत कराळे यांनी मानले.