शेतकऱ्यांचे वीजबिल शासनाने भरावे – रमेश आजबे शेतकरी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे भाजपा खोटे बोलण्यात माहिर

0
225

जामखेड न्युज——

शेतकऱ्यांचे वीजबिल शासनाने भरावे – रमेश आजबे
शेतकरी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
भाजपा खोटे बोलण्यात माहीर 

अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन महावितरण कट करत आहे यामुळे जखमेवर मीठ चोरण्याचा काम भाजपा सरकार करत आहे. आणी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की कोणाचेही कनेक्शन कट करू नका अशा सूचना दिल्या आहेत. पण महावितरण सांगत आहे. आम्हाला अशा सूचना नाहीत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी उद्या सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे यात सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून आपल्या भावना शासनापर्यत पोहचू शासनाने शेतकऱ्यांचे वीजबिल शासनाने भरावे असेही आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी केले.

अतिवृष्टीमुळे खरीप वाया गेले विहिरीत पाणी आहे रब्बी चांगले येईल अशी आशा असताना महावितरण शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करत आहे. वीज बील भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. तेव्हा सरकारने शेतकरी वीज बील माफ करावे. भाजपा बोलते एक आणी वागते वेगळे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोध पक्षनेते असताना सांगत होते की, मध्यप्रदेश सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने वीजबिल माफ करावे आता ते सत्तेत आहेत तेव्हा शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावे. असे आवाहन आजबे यांनी पत्रकार परिषदेत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा संदर्भात पत्र दिले होते या पत्राला महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी उत्तर दिले आहे

“महाराष्ट्र शासन कृषी धोरण २०२० “नुसार विज ग्राहकांनी सप्टेंबर २०२० नंतरचे सर्व बिले भरणे आवश्यक आहे अन्यथा शेतीपंप विज ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करण्यात येतो त्यामुळे महावितरण कंपनीच्या वरीष्ठ कार्यालयाने
शेतीपंप विज बिल वसुल करण्याबाबत तसेच विज देयक न भरणा-या शेतीपंप ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करणे बाबत मिटींग मध्ये सूचना दिलेल्या आहेत तसेच मा. उपमुख्य मंत्री व मा. उर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडनविस साहेब यांनी कमीत कमी चालू विज देयक भरूण घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तरी वरील प्रमाणे शेतीपंप ग्राहकांनी कमीत चालू विज देयक भरल्यास त्यांचा विज पुरवठा खंडीत केला जाणार नाही. असे महावितरणने कळविले आहे.
इकडे मात्र भाजपावाले सांगतात उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिले आहेत कोणाचेही वीज कनेक्शन कट करू नका खोट्या बातम्या पसरविण्यात भाजपा माहिर आहे असेही आजबे यांनी सांगितले.
तेव्हा उद्या होणाऱ्या मोर्चात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here