ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कृष्णा लटकेचा आदर्श घ्यावा – जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके

0
226

जामखेड न्यूज—-

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कृष्णा लटकेचा आदर्श घ्यावा – जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके!!! 

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जिद्द, चिकाटी व मेहनतीने न्यायाधीश झालेल्या कृष्णा लटकेचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे आवाहन जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके यांनी व्यक्त केले.

जामखेड तालुक्यातील शिऊर येथील कृष्णा शिवाजी लटके यांची न्यायधीश पदावर नियुक्ती झाल्याबद्दल तसेच दिलीप निमोणकर हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल पत्रकार अशोक निमोणकर यांच्या आँफीसमध्ये सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके साहेब, न्यायाधीश कृष्णा लटके, पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अशोक निमोणकर, अविनाश बोधले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस संजय वारभोग, मंडलाधिकारी बाळासाहेब लटके यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कृषा लटके यांचे प्राथमिक शिक्षण शिऊर, उच्च माध्यमिक ल. ना. होशिंग तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. शेतकरी कुटुंबातील मुलगा न्यायाधीश झाल्याने झाल्याने गावातील स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्‍या मुलांना निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचा यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण आहे. याचा आदर्श ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपले कर्तुत्व सिद्ध करावे.

शिऊरचे शेतकरी शिवाजी लटके यांचा मुलगा कृष्णा यांची पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी पदी निवड झाली. आई-वडिल शेतकरी, आजोबा वैजिनाथ (नाना) लटके मंत्रालयात सचिव होते. चुलते बाळासाहेब लटके जामखेड तहसिलमध्ये अधिकारी आहेत. कृष्णाने याच दोघांचा वारसा पुढे चालवला आहे.

९ डिसेंबर पासून एका वर्षाचे त्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र न्यायीक अकँडमी उत्तन मिरा भाईंदर जवळ सुरू होत आहे. याबद्दल त्यांना सर्वानी शुभेच्छा दिल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here