जामखेड करांना मिळणार विचारांची मेजवानी रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम यांच्यावतीने तीन दिवस व्याख्यानमाला

0
215

 

जामखेड न्यूज—-

जामखेड करांना मिळणार विचारांची मेजवानी!!! 

रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम यांच्यावतीने तीन दिवस व्याख्यानमाला!!! 

तालुक्यातील शिऊर येथील रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम यांच्या वतीने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असुन या व्याख्यानमालेचा समाजातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम मठाचे पदाधिकारी यांचे वतीने करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेचे हे १५ वर्षे असून २०२२ मध्ये प्रामुख्याने देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आवर्जून या व्याख्यानमाला आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामुळे तीन दिवस जामखेड करांना विचारांची मेजवानी मिळणार आहे.

जामखेड शहरातील गोरोबा कुंभार चित्रमंदिर येथे होणाऱ्या या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प दि. १५ नोव्हेंबर रोजी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथील कार्यकर्त्या श्रीमती जान्हवी केळकर या गुंफणार असून “राष्ट्र उभारणीत महत्त्व कुटुंबाचे” हा त्यांचा विषय आहे.

दुसरे पुष्प दि. १६ नोव्हेंबर रोजी स्वामी ज्ञानगम्यानंदजी महाराज रामकृष्ण मठ ,नागपूर हे ” स्वामी विवेकानंद नसतेच तर..?” विषयावर गुंफणार आहेत.

 

दि. १७ नोव्हेंबर रोजी स्वामी ज्ञानगम्यानंदजी महाराज रामकृष्ण मठ ,नागपूर हेच “मला अध्यात्मिक व्हायचंय!” या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत.

दि. १५, १६ व १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ : ०० ते ८ :०० वाजेच्या दरम्यान ही व्याख्यानमाला होणार आहे.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम शिऊर मठाचे अध्यक्ष उमेश देशमुख, उपाध्यक्ष अशोक पितळे, सचिव संजय गुंदेचा व संचालक मंडळाने केले आहे.

शिऊर येथील रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम यांच्या वतीने शिऊर व जामखेड (संत गोरोबा चित्र मंदीर) येथे धर्मार्थ दवाखाना, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. रामकृष्ण- विवेकानंद वेदांत साहित्याची विक्री सेवा तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन. ग्रंथालय, शाळा, कॉलेज मधून विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन. हे उपक्रम निरंतरपणे सुरू असून समाजातील अनेक नागरिकांना याचा फायदा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here