थांगता मार्शल आर्ट स्पर्धेतील यशामुळे जामखेडचे नाव राज्यात प्रसिद्ध – प्रा. कैलास माने ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलतर्फे यशस्वी खेळाडूंचा सन्मान

0
211

 

जामखेड न्यूज—-

थांगता मार्शल आर्ट स्पर्धेतील यशामुळे जामखेडचे नाव राज्यात प्रसिद्ध – प्रा. कैलास माने
ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलतर्फे यशस्वी खेळाडूंचा सन्मान

जामखेडमधील तरूण – तरूणी विविध खेळांमध्ये सातत्याने मोठे यश मिळवत आहेत. या यशातून जामखेडचे नाव राज्यात झळकत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत, याचाच भाग म्हणून राज्यस्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेतील विजेत्यांंचा गौरव करण्यात आला थांगता मार्शल आर्ट स्पर्धेतील यशामुळे जामखेडचे नाव राज्यात प्रसिद्ध झाले आहे असे प्रा. कैलास माने यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या 26 व्या राज्यस्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत जामखेड येथील 4 मुलींनी सुवर्ण, कांस्य, रौप्य या पदकांंची लयलूट करत यशाची पताका फडकावली. याबद्दल ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या वतीने विजेत्या तरूणींचा गौरव करण्यात आला.

स्टेट कोच ईशा पारखे हिच्या मार्गदर्शनाखाली जामखेड येथील दिक्षा पंडित,कोमल डोकडे, सुवर्णा भैसडे, मोहिनी शिरगिरे या तरूणींंनी कोल्हापूर येथे पार पडलेल्या 26 व्या राज्यस्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश मिळवले. या यशाबद्दल जामखेड येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलच्या वतीने चौघा तरूणींचा सन्मानचिन्ह देऊन आज गौरव करण्यात आला.

यावेळी शाळेचे अध्यक्ष प्रा कैलास माने, शाळेच्या सचिव वर्षा कैलास माने, प्राचार्य अभिजित उगले, संगणक शिक्षक शिवमुनी बांगर, उषा मिसाळ, पुजा घंटे, उर्मिला लटपटे, सबिया खान, तेहरिन पठाण, राधा बांगर, सह आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here