बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी 169 जणांना अटक करण्याचे आदेश!!

0
236

जामखेड न्यूज—-

बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी 169 जणांना अटक करण्याचे आदेश!!

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Beed District Central Co-Operative Bank) अपहार प्रकरणी 169 आरोपीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. बीडच्या (Beed News) जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 2013 साली मोठा अपहार झाला होता आणि याच प्रकरणी 169 आरोपीविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. अटक वॉरंट जारी केल्यानंतर वडवणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सदर बँक अपहार प्रकरणातील आरोपी सतत न्यायालयात तारखेसाठी हजर न राहिल्याने या सर्वच 169 आरोपी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून वडवणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. राज्यभर गाजलेल्या बीडच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अपहार करण्यात अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आता पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आले असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. तर उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथक रवाना झाले आहेत.

काय आहे बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरण?

एके काळी 1100 कोटी ठेवी असलेली बीडची जिल्हा बँक संचालक आणि अधिकारी यांच्या नियमबाह्य कर्ज वाटपामुळे अडचणीत आली. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून वेगवेगळे साखर कारखाने , सुत गिरण्या , पणन संस्था , खाजगी उद्योग , यांना तब्बल 150 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले होत. यातील बरेच कर्ज भरण्यात आले आहे

ज्यांना हे कर्जवाटप केलं या संस्थाकडे पूर्वीची थकबाकी असताना आणि अनेक संस्था या बुडीत असल्याचे माहित असताना देखील शिक्षण संस्था जिल्ह्याबाहेरील कर्जदारांना जिल्हा बँकेच्या संचालकांनी कर्ज वाटप केले होते. या सर्व कर्ज वाटपाच्या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने याच बीड जिल्हा बँकेवर शिवानंद टाकसाळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

आर्थिक गैरव्यवहार झाल्यानंतर शिवानंद टाकसाळे यांच्या ताब्यात बँक आल्यानंतर त्यांनी या संस्थांकडे कर्जाची वसुली सुरू केली. वारंवार आदेश देऊन देखील जिल्हा बँकेने दिलेल कर्ज वसूल होत नसल्याने शिवानंद टाकसाळे यांनी या संस्थां व कर्ज घेणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

बँकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार व कर्ज बुडवल्याप्रकरणी 2013 साली 269 जणांवर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर यातील एकही आरोपी कोर्टात तारखेला हजर न राहिल्याने आता वडवणी कोर्टाने थेट या 269 जणांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तर याच प्रकरणातील तीन आरोपींना वडवणी पोलिसांनी अटक केली आहे.

बँक अपहार प्रकरणातील आरोपी सतत न्यायालयात तारखेसाठी हजर न राहिल्याने या सर्वच 169 आरोपी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून वडवणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केला आहे. राज्यभर गाजलेल्या बीडच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अपहार करण्यात अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आता पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आले असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे तर उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथक रवाना झाली आहेत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here