जामखेड न्यूज—-
सागर कोल्हे यांना बिनविरोध सरपंच करावे – सरपंच गणेश कोल्हे
कार्यसम्राट आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात एक आदर्श गाव निर्माण करण्यासाठी तसेच गावच्या सर्वागीण विकासासाठी राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी सागर कोल्हे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहावे व सागर कोल्हे यांना राजुरी गावचे बिनविरोध सरपंच करावे असे आवाहन सरपंच गणेश कोल्हे यांनी ग्रामस्थांना केले आहे. तसेच सरपंच पदासाठी माझा संपूर्ण पाठिंबा सागर कोल्हे यांना राहिल असे गणेश कोल्हे यांनी सांगितले.
जनतेतून बहुमताने सरपंच होण्याचा पहिला मिळालेले गणेश कोल्हे यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात अतिशय चांगले काम केले, विविध योजना गावातील गरजू गोरगरीब लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. गेली 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य व 5 वर्ष जनतेतून सरपंच असा त्यांचा कार्यकाळ आहे.
यावेळी आपल्यातीलच नवीन चेहऱ्याला संधी मिळावी म्हणून येणारी निवडणूक न लढवण्याचा निर्णय गणेश कोल्हे यांनी घेतला आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी सागर भाऊ कोल्हे या तरुण चेहऱ्याला पूर्णपणे सहकार्य करून पुढच्या पाच वर्षात राजुरी गावचा चेहरा मोहरा बदलवणार आहे. येणारी निवडणूक ही माझ्या अस्तित्वाची आहे पण मला पूर्ण विश्वास आहे की राजुरी, डोळेवाडी, घुलेवस्ती, एकबुर्जी, बांगरवस्ती येथील सुजाण जनता सागर भाऊ च्या पाठीशी ठामपणे उभी राहील असेही सांगितले.
कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत व भविष्यात दादांच्या मार्गदर्शनाखाली राजुरी हे गाव तालुक्यातील एक आदर्श गाव निर्माण करू, काही लोक वेगवेगळी चर्चा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील त्याकडे मी कसलेही लक्ष देत नाही, ही निवडणूक फक्त विरोधाला विरोध म्हणून सर्वसामान्य जनतेवर लादली जात आहे नाही तर सागर भाऊ सारख्या प्रामाणिक युवा कार्यकर्त्याला बिनविरोध सरपंच करावं असं मी आव्हान करतो. तसेच
विरोधी पार्टीकडे अजून कोणता उमेदवार आहे हेच कळायला तयार नाही, ज्यांना आपल्या गावाने 10 वर्ष सरपंच पद दिले त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे होती पण असो तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असा टोलाही विरोधी उमेदवाराला नाव न घेता लगावला
सागर कोल्हे यांनी आतापर्यंत कोणतेही पद नसताना गावात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. नदी खोलीकरण, गावात मुरमीकरण, गाव व वाडी वस्तीवर लाईट, शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तके वाटप, शाळेसाठी विविध स्वरूपाची मदत यामुळे आपण सर्वांनी सागर कोल्हे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन केले.
येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविण्याचा निर्णय गणेश कोल्हे यांनी जाहीर केला.