जामखेड न्यूज—-
जमीन मोजणी करण्यासाठी जात असताना टोळक्याकडून मारहाण अकरा जणांविरोधात जामखेड पोलीसात गुन्हा दाखल
जमिनीची मोजणी करण्यासाठी भुमी अभिलेख येथील अधिकार्यांना घेऊन जात असताना त्यांना तेथे जमलेल्या टोळक्याने फीर्यादी व साक्षीदार यांना लोखंडी गजाने मारहाण केली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एकुण ११ जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांन कडुन मिळालेली माहिती अशी की फीर्यादी बिस्मिल्ला खान सर्वरखान पठाण (सेवा निवृत्त) वय ७३ रा. बालवीर सना फंक्शन, बीड हे काल दि ११ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या शेत गट नंबर २९८ गटाच्या मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांना घेऊन जात असताना जामखेड ते खर्डा रोडवरील चौफुला या ठीकाणी आरोपी जाकीर जहीर शेख, हर्षद आयबु शेख, शम्मु इस्माईल शेख , आयबू शेखलाल शेख इनामदार , इस्माईल शेखलाल शेख, इसाक शेखलाल शेख, ताहेर जाहीर शेख, इस्माईल नासिर मापाडी, फिरोज पोपट मापारी, ताहीर शेख यांची मुले,व जाहीर शेख यांची सर्व मुले राहणार जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काँन्टेबल अजय साठे हे करत आहेत.