जामखेड न्यूज—-
शाळा सुसंस्कृत नागरिक घडवितात -न्यायाधीश रजनीकांत जगताप
श्री नागेश विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न.
जामखेड तालुका विधी सेवा समिती व वकील संघ व श्री नागेश विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागेश विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश रजनीकांत जगताप तहसीलदार योगेश चंद्रे गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, केंद्रप्रमुख नारायण राऊत , स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर, प्राचार्य मडके बी के ,उपप्राचार्य तांबे ए एन ,पर्यवेक्षक रघुनाथ मोहळकर, मुख्याध्यापिका चौधरी के डी एडवोकेट एम एन नागरगोजे, रमेश बोलभट, एनसीसी प्रमुख मयूर भोसले, सुनील भमुद्रे, विनोद नाईकनवरे, अनिल चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण, नागेश संकुलातील शिक्षक विद्यार्थी सर्व सेवक उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून न्यायाधीश यांना एनसीसीच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
शिष्यवृत्ती मध्ये पात्र नागेश 65 व कन्या 40 विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्पेशल फॉर्स आर्मी मध्ये भरती झालेल्या शिवम काळे सत्कार करण्यात आला व 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर कॅम्प प्रमाणपत्र एनसीसी विद्यार्थ्यांना न्यायाधीश जगताप साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी विद्यार्थ्यांना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कायद्याविषयी माहिती सांगितली त्यामध्ये बाल हक्क कायदा महाविद्यालय जीवनात होणाऱ्या रॅगिंग विषयी कायदे, महिला अत्याचार, बाल छळवणूक, वाईट स्पर्श संदर्भात कायद्यांची माहिती दिली. 18 वर्षे पूर्ण झाले तर वाहन परवाना काढून वाहन चालवणे. लोकन्यायालयाचे सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कौटुंबिक व कोणत्याही हिंसाचाराला बळी पडू नये.
सुसंस्कृत नागरी शाळेमध्ये घडले जातात. विद्यार्थी विद्यार्थिनीना कोणतीही अडचण असली तर विद्यालय, पोलीस प्रशासन किंवा आम्हाशी संपर्क साधला असे मार्गदर्शन केले.
तसेच लोक न्यायालय, मध्यस्थी, कौटुंबिक हिंसाचार कायदा, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, विद्यार्थ्यांचे अधिकार, याविषयी शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच तहसीलदार योगेश चंद्र यांनी शिक्षण हक्क कायदा संदर्भात माहिती दिली.
तसेच विद्यालयामध्ये विधी सेवा प्राधिकरण कायदेशीर माहिती, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, लोकन्यायालय व सर्व कामकाज, वैकल्पिक वाद निवारण पद्धती, रॅगिंग, बालकांचे हक्क कायदे यांचे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के, सूत्रसंचालन रमेश बोलभट आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका चौधरी के डी यांनी केले.