जामखेड न्यूज—-
देशसेवक हरिदास वराट यांच्या सेवानिवृत्ती बद्दल साकत मध्ये भव्य-दिव्य सपत्नीक मिरवणूक!!
श्री साकेश्वर विद्यालयातही सत्कार संपन्न!!!
तालुक्यातील साकत येथील हरिदास गोविंद वराट लान्स हवालदार पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले यामुळे ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य अशी सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी जागोजागी सत्कार करण्यात आला.
गावात भव्य-दिव्य मिरवणूक पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, सरपंच हनुमंत पाटील, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, माजी सरपंच सदाशिव वराट, रामहरी तावरे सर, अर्जुन घोलप सर, दिनकर मुरूमकर, शंकर वराट, युवराज वराट, हरीभाऊ वराट, गणेश वराट, दादासाहेब वराट, नागेश वराट, शाहुराव जावळे, संग्राम मोहिते, आण्णासाहेब शिकारे, गोलेकर सर, पोपट मुरूमकर, पोपट वराट, चंद्रकांत वराट, सतिश मुरूमकर, महादेव वराट,अशोक वराट, रामहरी वराट, राम वराट फौजी, केशव वराट, नारायण वराट यांच्या सह आई वडील, पत्नी, भाऊ मुले यांच्या सहअनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना हरिदास वराट यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी मोबाईल पासून दूर राहावे, शारीरिक तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करावा. जिद्द चिकाटी व मेहनत अंगी असेल तर नक्कीच यश मिळेल.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना दत्तात्रय काळे म्हणाले की, जीवनात शिस्त येण्यासाठी सैन्यात नोकरी करणे महत्त्वाचे आहे. दुर्दम्य इच्छा शक्ती असेल तर नक्कीच यश मिळते. असेही सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, सत्कार मुर्ती सेवानिवृत्त लान्स हवालदार हरिदास गोविंद वराट, पालक शाहुराव जावळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुदाम वराट तर आभार अर्जुन रासकर यांनी मानले.