ऐतिहासिक खर्डा पर्यटन विकास निधीबाबत आमदार रोहित पवारांकडून भ्रमनिरास – रवींद्र सुरवसे आय लव्ह शिवपट्टन युवक संघटनेमार्फत किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण

0
211

 

जामखेड न्यूज—-

ऐतिहासिक खर्डा पर्यटन विकास निधीबाबत आमदार रोहित पवारांकडून भ्रमनिरास – रवींद्र सुरवसे

आय लव्ह शिवपट्टन युवक संघटनेमार्फत किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण

कर्जत जामखेडचे तत्कालीन आमदार व माजीमंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी दिलेल्या कोट्यावधी रूपयांच्या निधीतून खर्डा किल्ला व शहरातील ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यात आला. मात्र आमदार रोहित पवार यांनी खर्डा किल्ल्याजवळ भगवा ध्वज बसवला मोठा कार्यक्रम पण घेतला तेव्हा जामखेडच्या लोकांना आमदार रोहित पवार किल्ल्यासाठी मोठा निधी देतील असे जनतेला वाटत होते पण तसे झाले नाही. भ्रमनिरास झाला आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खर्डा शिवपट्टन येथे आय लव्ह शिवपट्टन युवक संघटनेमार्फत किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रवींद्र सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपाचे नेते रवींद्र सुरवसे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रा.सदस्य वैजीनाथ पाटील, दीपक जावळे, महालिंग कोरे, महेश लोंढे, मनोज देशमुख, बबलू गोलेकर, सोनू सुरवसे तसेच आय लव्ह शिवपट्टण संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर, नागरिक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

आता पुन्हा भाजपा व शिंदे गटाचे सरकार आले असून या सरकारच्या माध्यमातून पुर्वीप्रमाणेच निंबाळकर गडी व समाधी संवर्धनासाठी निधी आणून याठिकाणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविद्र सुरवसे यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे दिवाळी निमित्त आय लव्ह शिवपट्टन युवक संघटनेमार्फत भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२२ संपन्न झाल्या या स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांना भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविद्र सुरवसे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

काल दि. ६ नोव्हेंबर रोजी खर्डा येथील ऐतिहासिक निंबाळकर राजे समाधी जवळ हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पुढे बोलताना सुरवसे म्हणाले की, आ. राम शिंदे यांच्या माध्यमातून अगोदर तीन कोटी आणले आणि आत्ता पुन्हा किल्ल्यासाठी तसेच बारा ज्योतिर्लिंगासाठी निधी आणणार आहोत आ. राम शिंदे यांच्या माध्यमातून किल्ल्यासाठी मागील काळात भरीव निधी आणलाच होता. तर अजूनही किल्ल्याच्या विकास कामासाठी निधी आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, तसेच खर्डा पंचक्रोशी व जिल्हा परिषद गटासाठीही मोठा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कला जाईल असेही मत रवींद्र सुरवसे यांनी केले.

यावर्षी खर्डा येथे पार पडलेल्या किल्ले बनवा स्पर्धेचे पहिले वर्ष होते. यापुढे या स्पर्धेत जास्तीत जास्त मुले-मुली सहभागी होतील असा विश्वास रवींद्र सुरवसे यांनी व्यक्त केले.

यावेळी पार पडलेल्या स्पर्धेतील विजेत्यांची नावे.
1) चि. ओमसाईराज रमेश इंगळे
2 )कु. मयुरी बबन नाईक
3) चि.यश शशिकांत गुरसाळी
1) चि. नयन जितेंद्र जावळे
2) कु. ज्ञानेश्वरी किशोर नाईक
3) चि. जवळे आर्यन अशोक
यांनी बक्षिसे मिळवली
या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here