बारा दिवसात जामखेड पोलीसांनी लावला हत्येचा तपास आरोपीस अटक

0
349

जामखेड न्यूज—-

बारा दिवसात जामखेड पोलीसांनी लावला हत्येचा तपास आरोपीस अटक!! 

जामखेड शहरापासून जवळच असलेल्या साकत फाटा येथील काँटन मील जवळ गणेश शिवाजी वारे वय ३० या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जळगाव येथील  तरुणाची कोणीतरी अज्ञातांनी टनक हत्याराने मारहाण करून दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हत्या करण्यात आली होती. यानुसार गुप्त माहिती नुसार जामखेड पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत तालुक्यातील सावरकर येथील दिपक रंजित भवर सावरगाव ( वय २३ ) या आरोपीस दि. ५ आक्टोबर रोजी रोजी अटक करण्यात आली आहे आरोपीने खुनाची कबुली दिली असून न्यायालयाने दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

साकत फाटा येथील लाँर्ड महावीर खाजगी शाळेजवळ असलेल्या काँटन मील जवळ एका तरूणांचा मृतदेह असल्याची माहिती सावरगावचे पोलीस पाटील यांनी जामखेड पोलीसांना दिली यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह पाहिला तर मयताच्या पोटावर, छातीवर, पाठीवर, डोक्यावर, हातावर व पायावर टनक हत्याराने मारहाण करून जीवे मारले असे दिसत होते. गु र क्र ४८५/२०२२ भादंवि ३०२ मधील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जामखेड पोलिसांनी मयताच्या नातेवाईकाचा शोध घेतला शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला व वेगवेगळे पथक करून तपास सुरू केला यानुसार पोलीसांना गुप्त माहिती मिळाली यानुसार पोलीसांनी एका आरोपीस अटक केली आहे तर दुसराही आरोपी लवकरच अटक करण्यात येईल असे जामखेड पोलीसांनी सांगितले.

आरोपीचा मोबाईल मयताने चोरला होता या रागातून आरोपीने मयताची हत्या केली असे तपासात उघड झाले आहे.पोलिसांनी श्वान पथक मागविले. 

दिपक रंजित भवर सावरगाव वय २३ या आरोपीस

५ तारखेला अटक करण्यात आली आहे त्यास
१० पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
दुसराही आरोपी लवकरच अटक करण्यात येईल असे जामखेड पोलीसांनी सांगितले.

 

बारा दिवसात हत्या करणारा आरोपी अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मँडम, पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, राजु थोरात, अनिल भारती, पोलीस काँन्टेबल अविनाश ढेरे, कोठुळे, विजय कोळी, आबा आवारे, सचिन पिरगळ तसेच  गुन्हे शोध  पथकाने कामगिरी बजावली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here