जामखेड न्यूज—-
काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ आजपासून महाराष्ट्रात. नगर जिल्ह्यातून एक हजार युवक जाणार
मा.बाळासाहेब थोरात साहेब व युवा नेते मा.सत्यजीत दादा तांबे यांच्या नेतृत्वाख़ाली अहमदनगर जिल्हयातून १००० युवक “भारत जोड़ो साठी’ जाणार – राहुल उगले पाटील
७ सप्टेंबर ला कन्याकुमारी येथून खा.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली भारत जोडो यात्रा एतिहासिक ठरणार असून २०२४ च्या परिवर्तनाची सुरवात आहे.असा विश्वास उगले यांनी व्यक्त केला.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, अहमदनगर जिल्हयातून १००० युवक विधीमंडळ पक्षनेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि माजी प्रदेशाध्यक्ष युवक कॉंग्रेस सत्यजीत दादा तांबे यांच्या नेतृत्वाख़ाली भारत जोड़ो साठी दि.१८ व दि.१९ नोव्हेंबर रोजी शेगाव, बुलढाणा येथे जाणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चे सचिव राहुल उगले यांनी दिली.
देगलूर जि. नांदेड येथे महाराष्ट्रात प्रवेश करत असून नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला व बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवस मार्गक्रमण करणार आहे तसेच कन्याकुमारी पासून सुरू झालेली ही भारत जोडो यात्रा १५० दिवसांची असून एकूण ३५७० किमी अंतर पार करुन काश्मिर येथे पोहोचणार आहे. खा. राहुल गांधी यांच्या समवेत ११८ पूर्णवेळ पदयात्री असून राज्यातील ९ पदयात्रींचा त्यात समावेश आहे.
पूर्णवेळ चालणाऱ्यांना ‘भारत पदयात्री’ म्हणून संबोधले जात असून राज्यातील ३७५ किमी अंतर चालणाऱ्यांना ‘राज्य पदयात्री’ म्हणून संबोधण्यात येत आहे. महाराष्ट्रात पदयात्रेचे एकूण १३ मुक्काम असून त्यापैकी नांदेड जिल्ह्यात ४, हिंगोली जिल्ह्यात ४, वाशिम जिल्ह्यात १. बुलढाणा ३ व अकोला १ असे मुक्काम असणार आहेत.
चौकट
जुलमी राजवटी विरुद्ध राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी लढा दिला होता त्याच पूण्यभूमीतील माती कलश मध्ये ती खा. राहुलजी गांधी यांना देण्यात येणार आहे.
आजची देशातील भ्रष्टाचार, आत्याचार या विरूध्दची लढाई खा.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रा भारतभर आहे.
मा.राहुल उगले पाटील, सचिव – प्रदेश युवक कॉंग्रेस,महाराष्ट्र