Tuesday, February 10, 2026
Home ताज्या बातम्या हरीच्याच चिंतने काळ घालावा- हभप ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे वै. रामचंद्र बोधले...

हरीच्याच चिंतने काळ घालावा- हभप ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह

0
230

 

जामखेड न्युज——

हरीच्याच चिंतने काळ घालावा- हभप ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे

वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह

     
हरीच्याच चिंतने काळ घालावा.एकांत राहावे,गंगास्नान करावे.देवाची पूजा करून तुळशीप्रदक्षिणा कराव्या.आहारात व्यवहारात नियम असावे.इंद्रियावर संयम असावा,जास्त बडबड नसावी,जास्त झोप हि नासावी असे मत हभप ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे यांनी साकत मधील वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह किर्तन सेवा झाली. 

श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात ह. भ. प.ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे यांचे किर्तन झाले.

  त्यांनी कीर्तन सेवेसाठी हा अभंग निवडला व त्याचे निरूपण केले. 

काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥
युक्त आहार विहार । नेम इंद्रियांसी सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥
देह समर्पीजे देवा । भार कांहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥३॥
अर्थ
हरीच्याच चिंतने काळ घालावा.एकांत राहावे,गंगास्नान करावे.देवाची पूजा करून तुळशीप्रदक्षिणा कराव्या.आहारात व्यवहारात नियम असावे.इंद्रियावर संयम असावा,जास्त बडबड नसावी,जास्त झोप हि नासावी.परमार्थ हे महा धन आहे,त्या योगे हरीच्या चरणांची प्राप्ती करून घे.हे सर्व जतन होण्या साठी हे नियम आहेत.तुकाराम महाराज म्हणतात देह हा देवाला समर्पण केला पाहिजे त्याचा भार स्वतःवर घेऊ नको,म्हणजे अवघा आनंदच तुला होईल.

 

 

  कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती कीर्तनासाठी हभप उत्तम महाराज वराट, हभप कैलास महाराज भोरे, बिभीषण महाराज कोकाटे, हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, हभप हरीभाऊ काळे, बाबा महाराज मुरूमकर, दिनकर मुरूमकर, मनोहर मुरूमकर, पुरूषोत्तम मोरे, दत्तू नाना वराट, उत्तरेश्वर वराट, बाजीराव वराट, आश्रम मुरूमकर, सपकाळ, दिपक अडसूळ यांच्या सह पारगाव घुमरा, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, देवदैठण, साकत भजनी मंडळ तसेच नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्था नगर येथील तीस चिमुकले वारकरी यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 

       सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.  

आज रविवार दि. १६ रोजी ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे आळंदी यांचे किर्तन झाले.
सोमवार दि. १७ रोजी संजयजी महाराज देशमुख
मंगळवार दि. १८ रोजी ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे
तसेच मंगळावर १८ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन तसेच
बुधवार दि १९ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल. 

 

      तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!