जामखेडचे सुपुत्र रऊफ शेख यांना राष्ट्रपती पदक!!!

0
243

 

  • जामखेड न्युज——

  • जामखेडचे सुपुत्र रऊफ शेख यांना राष्ट्रपती पदक!!!

 

नगर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेत कार्यरत असलेले जामखेडचे सुपुत्र पोलीस उपनिरिक्षक रऊफ शेख यांना राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

गुरूवारी दि.१३ आँक्टोबर रोजी मुंबई येथील राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या समारंभात पोलीस उपनिरिक्षक रऊफ शेख यांना राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते सन्मानपुर्वक राष्ट्रपतीपदक प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, लाच लचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रभात कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक जयकुमार यांच्या उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल रऊफ शेख यांना १५ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रपती पदक जाहिर झाले होते. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदक वितरण सोहळा घेण्यात आला नव्हता. गुरूवारी दि.१३ आँक्टोबर रोजी मुंबई येथील राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.

पोलीस उपनिरीक्षक रऊफ शेख हे मुळचे जामखेडचे असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण नगर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण श्रीरामपुर येथे झाले आहे. शेख यांनी आतापर्यंत अहमदनगर पोलीस मुख्यालय, श्रीरामपुर शहर व तालुका पोलीस स्टेशन , संगमनेर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग याठिकाणी जबाबदारी सांभाळली आहे.

या सन्माबद्दल शेख यांचे विविध सेवाभावी, सामाजिक संस्था तसेच मान्यवरांकडून त्यांच अभिनंदन होत आहे.

घरातील चार जण पोलीस सेवेत.

पोलीस उपनिरीक्षक रऊफ शेख यांचे वडील (कै.) समद इस्माईल शेख हे अहमदनगर पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर होते. शेख यांना एकुण ४ भाऊ आहेत. यापैकी थोरले भाऊ (कै.) ताहेर समद शेख हे पुणे येथे गुन्हे अन्वेषण शाखेत पोलीस निरिक्षक पदावर होते. तर दुसरे भाऊ फारूख समद शेख हे सध्या मुंबई रेल्वेमध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. रऊफ शेख यांचे अन्य दोन भाऊ मुस्ताक व जमील हे जामखेड येथे स्वत:च्या व्यावसायात कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here