जामखेड तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल गायकवाड पाटील

0
177
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
जामखेड तालुक्यातील पोलिस पाटील संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शिऊरचे अमोल गायकवाड पाटील यांची अध्यक्षपदी तर राजुरीचे दत्तात्रय मोरे यांची उपाध्यक्षपदी तर सचिवपदी कवडगावचे कांतीलाल भोरे यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत.
     या निवडीबद्दल जामखेडचे तहसिलदार  विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड,
पोलीस उपनिरीक्षक महेश जानकर, बाबासाहेब बडे, सुनील थोरात, पोलीस पाटील योगीनाथ जायभाय पाटील, निलेश वाघ पाटील, महादेव वराट पाटील, सिद्धेश्वर पवार, तुषार चव्हाण, निगुडे पाटील, डोंगरे पाटील, जगदाळे पाटील, गव्हाणे पाटील, देशमुख पाटील, डमरे पाटील यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या अभिनंदन केले आहे.
      मावळते अध्यक्ष तुषार चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज पर्यंत तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केले तसेच सहकार्य अमोल गायकवाड यांनाही सर्व जामखेड पोलिस पाटील करतील असा विश्वास आहे. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गायकवाड पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आणि तुम्हीच सर्वांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही संघटनेच्या अडीअडचणी साठी मी सदैव तत्पर राहील फक्त आपल्या सर्वांचे मला सहकार्य हवे आहे.
  पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी विषयी सर्वाशी विचारविनिमय करून मार्ग काढू असे नवनिर्वाचीत अध्यक्ष गायकवाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here