जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )
जिल्हाधिकारी यांनी आठवडे बाजार बंदचा घेतलेला निर्णय अन्याय कारक असून बाजार बंद करण्यापेक्षा निर्बंध कडक करावेत व कोरोना महामारीने मेटाकुटीला आलेल्या शेतकरी व गरीब जनतेला दिलासा द्यावा. यासाठी जामखेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.


यावेळी भटके विमुक्तांचे नेते ॲड. डॉ. अरुण जाधव, लोकअधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहळ, वंचीत आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिष पारवे, उपाध्यक्ष गणेश घायतडक, जिल्हा उपाध्यक्ष योगेश सदाफुले, मुकुंद घायतडक, अतुल वाघमारे, विशाल जाधव, बाबा सोनवणे, अजिनाथ जाधव, सागर भांगरे, राकेश साळवे, पिनु घायतडक, वैजीनाथ केसकर, संतोष चव्हाण, रामचंद्र चंदन, शेषराव वाघमारे, जयप्रकाश शेगर, विनोद काळे, गिरीश काळे, गणेश भानवसे. आदी कार्यकर्ते उपस्थित होते.