जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
तालुक्यातील सटवाई जवळका येथील स्थानीक महिलांनी गावातील दारुबंदी त्वरीत व्हावी यासाठी ग्रामपंचायीतीवर दारू बंदीच्या घोषणा देत आक्रोश करत मोर्चा काढला दारूबंदी करावी असे ग्रामपंचायतीस निवेदन देऊन दारू बंदी करण्याची मागणी केली तर त्वरीत निर्णय न झाल्यास तहसील व पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्याचा इशारा
आंदोलनकर्त्यां महिलांनी दिला आहे.
तालुक्यातील सटवाई जवळका येथील महिला तळीरामाच्या त्रासाला कंटाळून गेल्या आहेत त्यामुळे दारुच्या विरोधात संतप्त झाल्या आहेत याा महिलांनी त्वरीत दारुबंदी करण्यात यावी यासाठी संघटीत होऊन दारूबंदीच्या घोषणा देत जवळका ग्रामपंचायीती वर आपला मोर्चा नेला यावेळी सरपंच उषा सुभाष माने यांचे पती सुभाष माने उपसरपंच वंदना संतोष वाळुंजकर यांचे पती संतोष वाळुंजकर ग्रामपंचायतसदस्य भाऊसाहेब दळवी, बबरुवान वाळुंजकर, वाळुंजकर मेजर सह ग्रामपंचायत सर्व सदस्य व कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते.

सरपंच माने यांनी निवेदन स्विकारून मिटींग मध्ये चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले मात्र त्वरीत निर्णय न झाल्यास आपण तीव्र आंदोलन करणार असल्याचा गंभीर इशारा यावेळी मोर्चा मधील महिलांनी दिला या मोर्चा मध्ये संगीता वाळुंजकर, नंदा बोराडे, पुष्पा कदम, सुनीता माने, मैना माने, मिरा माने, कुसुम वाळुंजकर, मीना वाळुंजकर, आशा कदम, सुजाता माने, सारीका साठे, शारदा वाळुंजकर, राजुबाई मंडलीक, आशा बनसोडे, सोजराबाई माने, पार्वती वाळुंजकर, मंदा मंडलीक, सुशिला बोराडे, पुजा माने, शोभा वाळुंजकर, कांताबाई यादव, गंधराबाई मंडलीक, छबा हडोळे, सोजरबाई बताशे सह अनेक महिला व नागरीक उपस्थित होते या सर्व उपस्थित महिला व नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिकीया देत दारुबंदीची मागणी केली आहे