जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )
येत्या रविवारी म्हणजेच २८ मार्च रोजी जिल्हा शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन होत आहे, यामध्ये सत्ताधारी मंडळींनी काही पोटनियम दुरुस्ती मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये बँकेचं कार्यक्षेत्र राज्य करणे हा एक विषय आहे. परंतु कोणत्याही सभासदांना विश्वासात न घेता राज्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी तसेच केलेला भ्रष्टाचार झाकण्या साठी हा विषय समोर आणल्याचा आरोप सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांनी केला आहे.
यावेळी बोलताना सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत म्हणाले, ज्या मंडळाच्या नावाने मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आले ते मंडळ टिकवता आले नाही आणि आता बँक राज्य कार्यक्षेत्र करून आजून काय वेगळा पराक्रम करण्याच्या तयारीत आहेत हे सामान्य सभासदांना न उलघडलेलं कोडं आहे. मुळात कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना संचालक बोर्डाची मंजुरी आवश्यक असते नुकतीच सात संचालकांनी या निर्णयाला डी डी आर ऑफिस ला विरोध असल्याचे निवेदन दिले आहे. सत्ताधारी सोडून सर्व मंडळाने या निर्णयाला विरोध केला आहे त्यामुळे सत्ताधारीचा हा निर्णय कदापि यशस्वी होऊ देणार नाही अस ही राऊत यांनी सांगितले .
दुसरी पोटनियम दुरुस्ती स्टापिंग पॅटर्न ची एकीकडे सत्ताधारी बँकेचं राज्य कार्यक्षेत्र करायचे म्हणतायत आणि स्टाप कमी कारायचेही म्हणतायत यात ही विसंगत पण दिसून येतो. कोरोनाच्या प्रादुर्भाव असताना आणि खर्चास कुठलीही मान्यता नसताना श्रीगोंदा आणि पाथर्डी तसेच मुख्यालय या ठिकाणी केलेला खर्च ही संशयास्पद आहे. त्याच बरोबर शताब्दी महोत्सव च्या नावाखाली १ कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा केली यामध्ये एक पुस्तिका काढल्याचे अहवालात सांगून त्यासाठी चार लाख २२ हजार रक्कम खर्च केल्याचे दाखवले आहे परंतु आजपर्यंत एकही सभासदाला ती पुस्तिका मिळली नाही त्याचा ही खुलासा सत्ताधार्यांनी करणे गरजेचे आहे, सावित्री च्या लेकी या कार्यक्रमाला साधारण १० लक्ष रुपये खर्च केले आणि फक्त १०० आणि आपल्याच संघटनेच्या पाहून हा पुरस्कार देण्यात आला म्हणजे उर्वरित आमच्या महिला भगिनी यांच्यावर अन्याय झाला नाही का हा प्रश्न अनुत्तरित आहे.
घड्याळ खरेदी आणि आणि वाटप याबाबत सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत सभासदांना मिळली नाहीत त्याची चौकशी चालू आहे त्याचा निकाल ही लवकरच येईल. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जो जाहीरनामा प्रसिद्ध सत्ताधार्यांनी केला त्यामधील कुठलीही गोष्ट पाळली गेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात सामान्य सभासद त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.तसेच सदिच्छा मंडळ हा लढा कायम ठेवील असे नारायण राऊत म्हणाले यावेळी सुनीता गिरमे, अर्चना भोसले, पाटोळे मॅडम, राजेंद्र शिंदे, रवी पिंपळे, गजानन ढवळे, माधव हासे, रहमान शेख, राजू बेहेळे, बबन गाडेकर, दादा वाघ, बाबा आव्हाड, शैलेश खनकर, बाळासाहेब डमाळ, रामदास दहिफळे उपस्थित होते.