जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे कमालीचे आग्रेसिव्ह झाले असून जे व्यावसायिक कोरोनाचे नियम (मास्क, सामाजिक अंतर,सॅनिटायजर) पाळणार नाहीत व आपल्या दुकानातील गर्दीवर नियंत्रण ठेवणार नाहीत अशा दुकानांवर कारवाई
कारवाई करावी असे जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनाला आदेश दिल्यानंतर तालुका प्रशासन खडबडून जागे झाले व शहरातील चौदा दुकानांवर कारवाई करत सात दिवसांसाठी सील करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आरोळे कोविड सेंटर मध्ये घेतलेल्या बैठकीत सांगितले होते की, लाॅकडाउन करण्यापेक्षा कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली व जर सर्वानी कोरोनाचे नियम पाळले तर आपण कोरोनाला हरवू शकतो. स्थानिक प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी त्यानुसार प्रशासनाने जामखेड शहरातील समृध्दी दुध, अंदुरे ब्रदर्स, अरिहंत गोळी सेंटर, घाडगे एजन्सी, एन के पॉवर टुल्स शेजारी, स्वयंभुराज किराणा, महाराष्ट्र चायनीज सेंटर, शिवशंकर इलेक्ट्रॉनिक, रविंद्र कलेक्शन, त्रिमूर्ती भेळ सेंटर, इंदोर कलेक्शन, समृध्दी पेढेवाले, महाराष्ट्र शु सेंटर, मुंबई मोबाईल शाॅपी अशी १४ दुकाने सात दिवसांसाठी सील करण्यात आली आहेत.

शहरातील चौदा दुकानावर कारवाई केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने आता आठवडी बाजार, भाजी बाजार यावर लक्ष द्यावे तसेच दिवसभर रस्त्यावर अनेक लोक फिरताना मास्क वापरत नाहीत त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला असतो. यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
मार्च महिन्यात जामखेड तालुक्यातील आठ व्यक्तींचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे दिघोळ मध्ये सहा अरणगाव एक सातेफळ एक अशा आठ व्यक्तींचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
सर्वांनी जर कोरोना नियमांचे पालन केले तर आपण कोरोनाला हरवू शकतो.