जामखेड प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच आता मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, या नियमांचे उल्लंघन एखाद्या आस्थापनामध्ये होत असेल, तर ती आस्थापना सात दिवस बंद करण्यात येणार आहे. तसे अधिकार तालुकास्तरावर तहसीलदार यांना व नगरपरिषद क्षेत्रात मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत. लाॅकडाउन करून अर्थचक्र ठप्प करण्यापेक्षा जे नियम पाळत नाहीत त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
असे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी कोरोना संदर्भात
जामखेड येथिल आरोळे कोविड सेंटर येथे प्रशासकीय अधिकारी व आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ. रवी आरोळे व शोभा आरोळे यांच्या समवेत बैठक झाली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षिरसागर, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे,
पोलिस उपनिरीक्षक महेश जानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाघ, डॉ. सुनील बोराडे यांच्या सह अनेक अधिकारी हजर होते.

यानंतर ते पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी मास्कचा व सॅनिटायझऱचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व आस्थापनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठीचे अधिकार ग्रामीण स्तरावर तहसीलदार यांना नगर नगरपरिषद स्तरावर मुख्याधिकारी यांना दिले आहेत. व तसा नियमित अहवाल जिल्हाधिकारी यांना द्यावा असेही सांगितले.
1) चौकट
आरोळे कोविड सेंटरने आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय केली आहे. सध्याही सुमारे दिडशे रूग्ण येथे उपचार घेत आहेत. तेव्हा हे सेंटर आर्थिक अडचणीत आहे तेव्हा वीजेची अर्धा खर्च शासनाने करावा अशी मागणी केली तेव्हा जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, हे कोवीड सेंटर शासनाचेच काम करत आहे त्यामुळे जेवढा वीजेची वापर होईल तेवढा खर्च देण्यात येईल कसे सांगितले.
2) चौकट
आजच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी कोरोना नियमांचे पालन न करणारे दुकानदार व नागरिक यांना दंड आकारावा तेव्हा आज संपुर्ण पथक खर्डा चौक ते सेंन्ट्रल बिल्डींग तसेच बीड रोडवरील कोरोना नियमांचे पालन न करणार्या सुमारे १४ दुकानांचे फोटो काढून ते नगरपरिषद प्रशासनाकडे देण्यात आले आहेत आता नगरपरिषद आता या दुकानावर कारवाई करणार आहे.