जामखेड प्रतिनिधी
शेतकर्यांच्या हितासाठी सहकार खाते व बॅक समन्वयाने काम करतील शेतकरी बांधवांनी आपल्याकडील पीक कर्जाचा भरणा ३१ मार्चपर्यंत करावा व शासनाच्या पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर भत्यासाठी पात्र व्हावे
तसेच दोन लाखांवरील वसुलीसाठी सचिवांनी चेअरमन व संचालक यांना विश्वासात घेऊन शंभर टक्के वसुली करावी
असे आवाहन नगर जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल राळेभात यांनी केले.
मंगळवार दि. २३ रोजी नवनियुक्त जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या अध्यक्षतेखाली सेवा संस्थेची थकबाकी वसूलीसाठी बैठक घेण्यात आली या वेळी सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर, तालुका विकास अधिकारी सरोदे, तालुका सचिव सतार शेख, वसुली अधिकारी नवगिरे तसेच तालुक्यातील सर्व संस्थाचे सचिव उपस्थित होते.यावेळी संचालक अमोल जगन्नाथ राळेभात यांचा सहकार विभाग व बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर म्हणाले की, दोन लाखांवरील थकबाकी वसुली साठी कायदेशीररीत्या १०१( १) अंतर्गत कारवाई करण्याचे व प्रसंगी जमिनी जप्त करून वसुली करण्यात येईल असे घोडेचोर यांनी सांगितले.