जामखेड न्युज——
युवकांचे आयडॉल प्रा. सचिन गायवळ सर
सामाजिक कामामुळे तरूणांना हवा हवा वाटणारा नेता
गेली अनेक वर्षापासून खर्डा जिल्हा परिषद गटात सामाजिक कामाच्या माध्यमातून व कोरोनाच्या काळात दिन दुबळ्या लोकांना मदतीचा हात देणारे दिलदार नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सचिन गायवळ हे तरुणांच्या सुख दुःखात मिसळत आहेत व तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल आपलेपणाची भावना कधी होऊन जाते हे संपर्कात जाणाऱ्यांना सुद्धा कळत नाही असे तरुणांचे आयडॉल सचिन गायवळ सर यांचे नाव सध्या खर्डा जिल्हा परिषद गटाच्या राजकीय पटलावर गाजत आहे.
खर्डा शहरात यावर्षी नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. शहरात तब्बल नऊ ठिकाणच्या मित्र मंडळांनी देवीची स्थापना केली होती. यामध्ये मांढरदेवी नवरात्र उत्सव मंडळ चौंडेश्वरी नवरात्र उत्सव मंडळ व नवजीवन नवरात्र उत्सव मंडळातर्फे नऊ दिवस विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या नवरात्री उत्सवामध्ये प्राध्यापक सचिन सर गायवळ हेच खर्डेकरांचे मुख्य आकर्षण ठरले होते.
मंडळाच्या उत्सवानिमित्ताने त्यांनी वैयक्तिक देणगी असेल किंवा कार्यक्रमाच्या आयोजन असो किंवा ”तुमच्यासाठी काय पण” अशा सदाबहार गाणी व लावण्याचा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन असो त्यांनी मुक्तहस्ताने नवरात्र मंडळांना आर्थिक मदत केली त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जाणवत होता. सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रा. सचिन सर गायवळ यांना देवीच्या आरतीला येण्याची विनंती केली होती.
मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आवाहनाला ६प्रतिसाद देऊन सचिन सरांनी येडेश्वरी देवी मंदिर सोनेगाव रोड, मांढरदेवी मंदिर वडारवाडा, ओंकारेश्वर नवरात्र देवी ओंकारेश्वर प्रतिष्ठान देवी शुक्रवार पेठ, जय भवानी नवरात्र देवी मोमीन गल्ली, जय तुळजा भवानी नवरात्र देवी खडकपुरा गल्ली, नवजीवन नवरात्र देवी जुनी ग्रामपंचायत चौक, जय अंबिका नवरात्र देवी मातंग वस्ती, शिवछत्रपती नवरात्र देवी लोंढे गल्ली, चौंडेश्वरी मंदिर देवी कोष्टी गल्ली, येथील नवरात्र उत्सव स्थापन केलेल्या देवीच्या आरतीस उपस्थित राहून प्रत्येक देवीची मनोभावे दर्शन त्यांनी घेतले. त्यामुळे प्रत्येक मंडळातील कार्यकर्ते हे उत्साहित झाले होते, उपस्थित महिला भगिनींमध्ये आपल्या पाठीमागे एक कर्तव्य तत्पर भाऊ उभा असल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
प्रत्येक ठिकाणी आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रा. सचिन सर गायवळ यांच्याबरोबर फोटोसेशन करण्यासाठी तरुणांमध्ये उत्साह वाढत होता. त्यावेळी अनेक कार्यकर्ते बोलताना म्हणाले की, सर तुम्ही आमच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले परंतु पुढील भावी काळात आम्ही तुमच्याबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी ”तुमच्यासाठी काय पण” अशी भावनिक साद घालत आपली भावना व्यक्त केली असल्याचे चित्र मात्र यावेळी निश्चित पहावयास मिळाले.