जामखेड न्युज——
जामखेड शहरात भरदुपारी दोन गटात तुफान राडा
सात जणांविरोधात गुन्हा दाखल
जामखेड शहरातील खर्डा चौकात भर दुपारी दोन गटात तुफान हाणामारी सुरू झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीसांनी खाक्या दाखवताच राडा शांत झाला .
कोणताही गट फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला नाही सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली म्हणून जामखेड पोलीसांच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली व सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पो.कॉ/944 दिनेश रमेश गंगे वय-31 वर्ष, नेमणुक जामखेड पोलीस स्टेशन जामखेड यांनी गु.र.नं.व कलम :- 463 /2022 भा. द. वि. कलम 160 प्रमाणे पुढील सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नाव व पत्ता-
1) गुलजार शेखलाल शेख वय-23 वर्ष
2) तबरेज फैयाज शेख वय-23
3) सोहेल फारुख कुरेशी वय-27 वर्ष
4) साहील फारुख कुरेशी वय-26
सर्व रा.सदाफुले वस्ती,जामखेड ता.जामखेड
5)मुन्ना शामीर सय्यद वय-24
6) शहाबाज शामीर सय्यद वय-25 वर्ष
7) अकिब जावेद शेख वय-30 सर्व
रा.नुराणी कॉलनी ,जामखेड ता.जामखेड
या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गु.घ.ता.वेळ :-दि.05/10/2022 रोजीदुपारी 12/50 वा.चे.सुमारास खर्डा चौक,जामखेड ता.जामखेड ,जि.अहमदनगर येथे.
भर दुपारी गजबजलेल्या खर्डा चौक परिसरात अचानक दोन गटात तुफान राडा सुरू झाल्याने परिसरात एकच घबराट निर्माण झाली होती पोलीस घटनास्थळी दाखल होत आपला खाक्या दाखवताच राडा पांगला नंतर कोणीही फिर्याद दाखल करण्यासाठी जामखेड पोलीस ठाण्यात गेले नाही. परस्पर मिटून घेतले आहे असे सांगण्यात आले पण सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे म्हणून जामखेड पोलीसांनी दोन्ही गटातील सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. डी. लोखंडे वरील घटनेचा तपास करत आहेत.