जामखेड न्युज——
” होणार सुन मी या घरची ” मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान जामखेडकरांच्या भेटीला
नगरसेवक अमित चिंतामणी आयोजित ओपन गरबा दांडियासाठी खास उपस्थिती
कोजागिरी पोर्णिमा उत्सवानिमित्त सर्व महिलांसाठी दरवर्षी प्रमाणे ओपन गरबा दांडियाचे आयोजन नगरसेवक अमित चिंतामणी यांनी केले आहे या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे “होणार सुन मी या घरची ” मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान असणार आहे.
रविवार दि. ९ रोजी सायंकाळी सात वाजता ल. ना. होशिंग विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे खास आकर्षण
“होणार सुन मी या घरची ” मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान असणार आहे. प्रमुख उपस्थिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील असतील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे असतील.
अपेस्ट्रोपी डान्स अकेडमी व आकाश डान्स स्टुडिओ अ. नगर यांचे देखील या निमित्त डान्स परफॉर्मन्स होणार आहेत.
आपल्या विकास कामातून ओळख निर्माण करणारे प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक अमितभाऊ चिंतामणी यांनी प्रभागात शंभर टक्के क्राॅक्रिटीकरण, शंभर टक्के बंदिस्त गटारे व शंभर टक्के विद्युतीकरण व पाण्याची सोय असणारा प्रभाग १३ केला आहे. कामेही अत्यंत दर्जेदार केलेली आहेत. विकास कामाबरोबरच ते सामाजिक कामासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या नवरात्र उत्सव असल्याने शहरातील शेकडो महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडवून आणले आहे. सुमारे पन्नास गाड्या नेल्या होत्या हजारो महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडविले.
नगरसेवक अमित चिंतामणी हे गेल्या दहा वर्षांपासून नवरात्र महोत्सवा निमित्ताने आपल्या प्रभाग क्रमांक तेरा मधिल महीला भाविकांना पाथर्डी येथील मोहटा देवीच्या दर्शनासाठी घेऊन जात असतात .याच अनुषंगाने सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील नगरसेवक अमित चिंतामणी यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महीला भाविकांना मोहटा देवी दर्शन घडविले तसेच दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा उत्सवानिमित्त ओपन गरबा दांडियाचे आयोजन करत असतात आणि दरवर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीला आणत असतात.
नगरसेवक अमित चिंतामणी यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की, कोजागिरी पोर्णिमा उत्सवानिमित्त महिलांसाठी ओपन गरबा दांडियाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमासाठी “होणार सुन मी या घरची ” मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान असणार आहे. प्रमुख उपस्थिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील असतील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे असतील. तसेच अपेस्ट्रोपी डान्स अकेडमी व आकाश डान्स स्टुडिओ अ. नगर यांचे देखील या निमित्त डान्स परफॉर्मन्स होणार आहेत. तेव्हा कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन अमित चिंतामणी यांनी केले आहे.