जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र बीएचएमएस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या जामखेड होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज रत्नापूर चा बीएचएमएस प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत कु.शुभांगी फरकाडे ,कु.तेहरिम मेहंदी व कु.अपेक्षा खुळपे या अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील,सचिव डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील, प्राचार्या डॉ.राजेश्वरी रापता,डॉ.निर्मला ओव्हाळ, डॉ.सर्फराज खान,डॉ.झेहीबा शेख,डॉ.ज्ञानेश्वरी साखरे,डॉ.सांगळे आदींनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेमार्फत जामखेड येथे नर्सिंग,फार्मसी व होमिओपॅथीक अभ्यासक्रमाचे महाविद्यालय आहेत.रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थेमार्फत नियमितपणे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. कोरोना आपत्ती च्या काळात देखिल संस्थेने शंभर बेडेड कोरोना हॉस्पिटल सुरू करून मोफत सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच आरसेनिक अल्बम या कोरोना प्रतिबंधात्मक होमिओपॅथीक औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच लवकरच तालुक्यातील लोकांना मोफत होमिओपॅथीक व आयुर्वेदिक उपचार मिळावेत यासाठी तालुक्यातील प्रमुख गावात संस्थेच्या मार्फत होमिओपॅथीक व आयुर्वेदिक क्लिनिक व मोबाईल क्लिनिक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सचिव डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी दिली आहे.