जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट.)
पाटोदा तालुक्यातील पारगाव (घुमरा) येथील शेतकऱ्यांच्या अंगावर मंगळवार दि. 23 रोजी सकाळी वीज पडल्याने जाग्यावरच मृत्यू झाला यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाटोदा तालुक्यातील पारगाव (घुमरा) येथील शेतकरी शहाजी भुंजगराव भोसले वय 50 असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सकाळी शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते. खुप वेळ झाला, तरी घरी कसे आले नाहीत, म्हणून त्यांना पाहण्यासाठी शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. गेल्या दोन दिवसापासुन
परिसरात अवकाळी पावसाचा तडाका सुरु असुन यात अनेक भुसार पिकांसह फळबाग पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात आज एकाचा बळी गेला दरम्यान शेजारी जामखेड, भुम, परांडा, आष्टी याही तालुक्यातील पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.