पंढरपूरात प्रा. राम शिंदे विरूद्ध पार्थ पवार सामना रंगणार ?

0
592
जामखेड प्रतिनिधी 
  जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
कर्जत जामखेड व सांगोल्याचा पराभव जिव्हारी लागल्याने धनगर समाजाच्या वतीने माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना भाजपाकडून तर महाविकास आघाडीकडून आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली जावी अशी मागणी केली जात आहे. मात्र, असं असलं तरीही सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे पंढरपुरात पार्थ पवार आणि राम शिंदे यांच्यात सामना रंगणार का ? अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर येथील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बडे नेते पंढरपूरमध्ये येऊन ही उमेदवारी जाहीर न केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार याचं नाव चर्चेत आलं आहे.
दुसरीकडे भाजपाकडून आमदार प्रशांत परिचारक, उद्योगपती अभिजित पाटील, समाधान आवताडे, यांची इच्छुक म्हणून नावे पुढे येत आहेत. मात्र धनगर समाजाच्या वतीने माजी मंत्री राम शिंदे यांना भाजपने उमेदवारी दयावी अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत उमेदवार कोण? राष्ट्रवादीसमोर धर्मसंकट
या उमेदवारीबाबत राम शिंदे यांना दूरध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांनी याबाबत अशी प्रतिक्रिया दिली की, ‘पक्षाने उमेदवारी दिली तर आपण निश्चित ही पोटनिवडणूक लढवू. जर उमेदवारी नाही दिली तरी पक्षाचा प्रचार करू असे सांगितले.
दुसरीकडे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पार्थ पवारांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. असे पवार म्हणाले
आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. महाविकास आघाडीकडून पंढरपूरची जागा राष्ट्रवादी लढवणार आहे.
भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे असेही बोलले जात आहे. अशावेळी उमेदवार निवडीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पंढरपुरात एक बैठक पार पडली. त्यावेळी बराच गोंधळ झाल्याचंही समोर आलं.
स्थानिक स्तरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला जात आहे. अशावेळी जर पार्थ पवार यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यास पवार विरुद्ध शिदें असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here