जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
सगळीकडेच उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे प्राणी व पक्षांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. याच विचारातून ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी पक्ष्यांसाठी पाण्याची काही व्यवस्था करता येईल का विद्यार्थ्या मार्फत हा प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पक्षांविषयी संवेदनशीलता व पर्यावरणाविषयी आपुलकीची भावना तयार करण्याच्या दृष्टीने हरित सेना विभागाला सरांनी पक्षांना पाणी ठेवण्यासाठी एखादी वस्तू तयार करा असे सुचवले.

बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आपण अनेक वेळा ऐकल आहे की पक्षी पाण्याविना मरून पडलेले आहेत.त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी सामाजिक भावनेतून आपण सगळ्यांनीच सामाजिक काहीतरी देणं लागतो या भावनेतून स्वतः वेळ काढून घराच्या छतावर झाडांना एखादी छोटी वस्तू किंवा नुसते प्लेटमध्ये जरी धान्य ठेवलं व पाणी ठेवले, तरी पक्ष्यांची चांगली व्यवस्था होईल व त्यांचे हालअपेष्टा होणार नाही.हाच संदेश देण्यासाठी शाळेच्या वतीने पक्ष्यांसाठी धान्य व पाणी ठेवण्यासाठी शाळेचे कलाशिक्षक राऊत मुकुंद व हरित सेना विभागामार्फत बबनराव राठोड विज्ञान प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची व्यवस्था करण्यासाठी एखादी वस्तू करण्याचे ठरले, सगळ्यांनी विचार विनिमय करून टाकाऊ पासून टिकाऊ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काही तयार करता येईल का असा विचार विनिमय करून एक वस्तू तयार केली पाच लिटर प्लास्टिकचा ड्रम घेतला तो मधल्या बाजूने कट केला खालच्या भागांमध्ये पाणी साठवल जाईल व समोरून खराब झालेल्या कंपास चा तुकडा जोडला त्याच्या मध्ये धान्य ठेवता येईल म्हणजेच पाणी व धान्य एकाच ठिकाणी पक्षाला खायला प्यायला मिळेल अशा पद्धतीने तयार करून सोशल डिस्टन्स पाळून शाळेमध्ये ते विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध ठिकाणी झाडांना लावण्यात आले. या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी व पक्षी यांच्याबद्दल आवड निर्माण होईल यात शंका नाही.
पक्ष्यांसाठी पाणी व धान्य यासाठी झाडांना वस्तू बांधताना याप्रसंगी प्राचार्य श्रीकांत होशिंग, माजी मुख्याध्यापक रवींद्र निकाळजे, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश आडसूळ, शिक्षक प्रतिनिधी पोपट जगदाळे, समारंभ प्रमुख संजय कदम, ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब पारखे, अनिल होशिंग, कलाशिक्षक राऊत मुकुंद, विज्ञान प्रमुख बबनराव राठोड, अर्जुन रासकर, सुभाष बोराटे, रोहित घोडेस्वार, विशाल पोले, भागवत सुपेकर, हनुमंत वराट, नरेंद्र डहाळे, किशोर कुलकर्णी, विजय शिरसागर,साईप्रसाद भोसले, राघवेंद्र धनलगडे, उमाकांत कुलकर्णी,स्वप्नील जाधव,निलेश भोसले, अविनाश नवगिरे, सुरज गांधी, अमित सांगळे, विनोद उगले, शेटे भाऊसाहेब, सावंत भाऊसाहेब, ग्रंथपाल संतोष देशमुख, हनुमंत वराट, प्रमोद बारवकर,
या उपक्रमासाठी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.