जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
आजच्या धावपळीच्या युगात पर्वावरणाचा ऱ्हास व इंधनाचा भरमसाठ वापर करून प्रदुषण करणाऱ्यांचे प्रबोधन करणाण्यासाठी तब्बल ४००० किलोमीटरच्या सायकल प्रवासासाठी निघालेल्या साहसविरांना
गुगळे उद्योग समूहाचे दिलीप गुगळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही सायकल स्वारांचे प्रायोजकत्व स्विकारत काल दि १४ मार्च रोजी एच. यु. गुगळे उद्योग समुहाच्या वतीने हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
जामखेड येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. पांडुरंग सानप व केमिस्ट असलेले भास्कर भोरे हे दोन साहसवीर”सायकल रायडींग” अर्थात सायकल वरून प्रवास पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी तब्बल ४००० किलोमीटरचा प्रवासाचे ध्येय ठेवून काश्मीर ते कन्याकुमारी असा देशांच्या दोन टोकांचा प्रवास करून जनजागृती करण्यासाठी निघालेले आहेत.

के 2 के म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी अशी त्यांची सायकल यात्रा असून दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता जामखेड शहरातील एच. यु. गुगळे पतसंस्थेपासून हिरवा झेंडा दाखवून या सायकल स्वरांना निरोप देण्यात आला. एच.यु गुगळे उद्योग समुहाचे संचालक व सायकल रायडिंग यात्रेचे प्रायोजक रमेश गुगळे व दिलीप गुगळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सायकल स्वरांना निरोप देण्यात आला.
बीड रोडवरील एच.यु गुगळे पतसंस्थेसमोर आयोजित या छोटेखानी कार्यक्रमासाठी प्रतिष्ठीत व्यापारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, नागरिक व कर्मचारी उपस्थित होते. सर्वानी या साहस विरांना शुभेच्छा दिल्या.
एच. यु. गुगळे उद्योग समूहाचे दिलीप गुगळे यांच्या वाढदिवसानिमित्त हे प्रायोजकत्व गुगळे परिवाराचे स्विकारले आहे. यावेळी बोलताना रमेश गुगळे म्हणाले की, जामखेड शहराचे नाव देशात हे युवक नेत आहेत हा मोठा गौरव आहे. प्रत्येकाने सकाळी सायकल व पळणे व्यायाम करणे आवश्यक आहे. डॉ. सानप यांनी आतापर्यंत आयर्न मॅन स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा एक तास आगोदर पुर्ण करत इतिहास रचला होता. तसेच दरवर्षी गडकिल्ल्यांवर सायकल वर जात आसतात. आता ते पर्यावरण रक्षणाचा व इंधन बचतीचा संदेश देणार आहेत.