जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील महारुळी गुरेवाडी ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सौ अंजली लक्ष्मण ढेपे तर उपसरपंचपदी छबुराव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर गुलालाची उधळण करत ग्रामस्थानी जल्लोश केला
जामखेड तालुक्यातील महारुळी गुरेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी छबुराव राजाभाऊ ठाकरे यांची दिनांक दहा फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात आली होती मात्र सरपंच पदाची निवड बाकी होती ती निवड दि 15 मार्च रोजी घेण्यात आली यावेळी सौ अंजली लक्ष्मण ढेपे यांचा एकमेव सरपंच पदासाठी अर्ज दाखल असल्याने त्यांची सरपंच म्हणुन बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी प्रशांत माने यांनी घोषीत केले .
आमदार रोहित पवार तसेच प्रा. सचिन गायवळ सर यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक पार पडली.

यावेळी पंचायत समीती सभापती सुर्यकांत मोरे ,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, शेतकरी संघटनेचे मंगेश अजबे ,सुनील उबाळे ,प्रवीण पोते, हनुमंत मुरुमकर, शरद कारले, नान्नज सरपंच महेद्र मोहळकर ,आरुण माने ,ग्रामसेवक एन् एस् टेकाळे, कामगार तलाठी गजानन नागारे ,उप सरपंच छबुराव ठाकरे ,सदस्य संतोष ठाकरे ,सौ सुनीता अनपट, सौ उज्वला कोरडे ,सौ सोनाली जाधव ,प्रकाश मुळे सह ग्रामस्य बहुसंखेने उपस्थित होते निवडीनंतर liकार्यकर्ते व ग्रामस्थानी गुलालाची उधळण करून जल्लोष करत आपला आनंद व्यक्त केला तर आपण सर्व सामान्य नागरीकांचे प्रश्न व गावातील सोयी सुवीधा साठी प्रयत्न करु असे नवनिर्वाचीत सरपंच सौ अंजली ढेपे यांनी सांगीतले तर प्रशासनाच्या वतीने निवडणुक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या पुढील कार्यकाळास शुभेच्छा दिल्या.